मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– राष्ट्रवादी अजित पवार गटाने भाजपचा विरोध डावलून नवाब मलिकांना एबी फॅार्म दिला. गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये त्यांच्या उमेदवारींवरुन वाद सुरु होता. भाजपने त्यांचा प्रचार न करण्याचा निर्णय घेऊन विरोध दर्शवला होता. पण, या सर्व विरोधाला डावलून अजित पवार गटाने एबी फॅार्म दिला.
आज नवाब मलिक हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. अजित पवार गटाने अगोदरच एबी फॅार्म दिला होता. पण, तो जोडण्याबाबत नवाब मलिक यांना अद्याप कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत. ते मुंबईतील शिवाजीनगर – मानखुर्द मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. उमेदवारी दाखल केल्यानंतर नेमकं काय घडलं हे समोर येईल.