नवी दिल्ली ः झडप असणारे N-95 मास्क कोरोना विषाणूचा संसर्ग रोखू शकत नाही, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. आरोग्य सेवा महासंचालक डॉ. राजीव गर्ग यांनी सर्व राज्यांच्या आरोग्य सचिवांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे. राज्यांनी श्वसनासाठी झडप असणारे N-95 मास्क वापरण्यावर आपापल्या राज्यात बंदी घालावी, तोंड आणि नाक पूर्णपणे झाकण्याच्या नियमांचं पालन करावे, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.