मुंबई – जग आश्चर्यकारक रहस्यांनी भरलेले असून आजही पृथ्वीवर अशी अनेक रहस्ये आहेत. त्याविषयी कोणालाही काहीही माहिती नाही. अशाच एका रहस्यमय खोऱ्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत, त्या खोऱ्याबद्दल असे म्हणतात की, या खोऱ्यात गेलेले आजपर्यंत कोणालाही परत येताना सापडले नाही.
अरुणाचल प्रदेश आणि तिबेट यांच्या मध्ये ही दरी वसली आहे. या ठिकाणाला ‘शांग्री-ला व्हॅली’ म्हणून ओळखले जाते. शंग्री-ला येथील वातावरणाचा परिमाण, म्हणजे वेळेमुळे प्रभावित झालेल्या या ठिकाणी व्यक्ती अमर होते, असे मानले जाते. कारण अशा ठिकाणी वेळ थांबतो आणि लोक पाहिजे तितके आयुष्य जगू शकतात. या दरीला पृथ्वीचे आध्यात्मिक नियंत्रण केंद्र असेही म्हणतात.
जगभरातील बर्याच लोकांनी ‘शांग्री-ला व्हॅली’ शोधण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, परंतु आजपर्यंत कोणालाही यश आले नाही. अरुण शर्मा यांनी आपल्या ‘दॅट मिस्टरियस व्हॅली ऑफ तिबेट’ या पुस्तकात शांग्री-ला बद्दल उल्लेख केला आहे. त्यांच्या पुस्तकात म्हटले आहे की, युत्सुंग नावाच्या लामा यांच्या मते, शंग्री-ला खोऱ्यात काळाचा प्रभाव नगण्य असून तेथे मनाची, आयुष्याची आणि विचारांची शक्ती काही प्रमाणात वाढते. एखादी वस्तू किंवा एखादी व्यक्ती तिथे नकळत तिथे गेली तरीसुद्धा तो या जगात परत कधीच येऊ शकत नाही.
युत्सुंगच्या म्हणण्यानुसार, ते स्वत: या रहस्यमय खोऱ्यात गेले आहेत. त्यांचा असा दावा आहे की, तेथे सूर्यप्रकाश किंवा चंद्र नव्हता. एक गूढ प्रकाश सर्वत्र पसरत होता. या दरीचा उल्लेख ‘काल विज्ञान’ या तिबेटियन भाषेत सापडतो. सदर पुस्तक अजूनही तिबेटमधील तवांग मठांच्या ग्रंथालयात ठेवले आहे. या दरीला सिद्धराम असेही म्हणतात, ज्याचा उल्लेख महाभारतात वाल्मिकी रामायण आणि वेदांमध्येही आहे.
जेम्स हिल्टन नावाच्या लेखकानेही आपल्या ‘लॉस्ट होरायझन’ या पुस्तकात या रहस्यमय जागेबद्दल लिहिले आहे. तथापि, त्यांच्या मते ते एक काल्पनिक स्थान आहे. शँग्री-ला व्हॅलीबद्दल माहिती असलेले अनेक लोक कायमचे नाहीसे झाले. या बद्दल असेही म्हटले जाते की, चीनी सैन्याने ही दरी शोधण्यासाठी खूप प्रयत्न केले, परंतु त्यांना हे ठिकाण अद्याप सापडलेले नाही.