इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या असनी चक्रीवादळामुळे पूर्वेकडील किनारपट्टीच्या राज्यांमध्ये तीव्र भीती व चिंतेचे वातावरण आहे. अशातच एक चमत्कारिक घटना घडली आहे. आंध्र प्रदेशच्या सुनापल्ली या समुद्र किनारी असलेल्या बंदरावर ही घटना पहायला मिळाली.
चक्रीवादळामुळे समुद्र खवळलेला आहे. मोठ्या वेगाने लाटा किनाऱ्याकडे येत आहेत. अशातच चक्रीवादळामुळे एक सोनेरी रथ या बंदराच्या किनाऱ्यावर येत असल्याचे स्थानिक नागरिकांना दिसले. तातडीने काही नागरिकांनी समुद्राकडे धाव घेतली. मोठ्या महत्प्रयासाने त्यांनी हा रथ किनाऱ्याकडे आणला आहे. सोनेरी रंगाचा हा मोठा रथ आहे. तो बंदराच्या दिशेने कुठून आला हे कळू शकलेले नाही. मात्र, कुठल्यातरी देशातून हा रथ चक्रीवादळामुळे बंदराकडे आल्याचे सांगितले जात आहे. आम्ही गुप्तहेर आणि अन्य विभागांना याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
बघा या सोनेरी रथाचा हा व्हिडिओ
https://twitter.com/ANI/status/1524243235899842560?s=20&t=EAbRZb4Uez4KI4KG6oLmyQ