इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अभिनेता शाहरुख खानचा बहुचर्चित चित्रपट ‘पठाण’ची बॉलीवूडमध्ये धूम सुरू आहे. ५०० कोटींच्या वर उड्डाण घेणाऱ्या ‘पठाण’ने बॉलीवूडचे आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. सुरुवातीला बॉयकॉट आणि नंतर गाण्यांवर वाद निर्माण झाला असताना आता प्रदर्शनानंतर ‘पठाण’ची गाणी देखील चांगलीच गाजत आहेत. चित्रपटातील ‘झुमे जो पठाण’ हे गाणे चांगलेच गाजत आहे. यावर अनेकांनी रिल्स बनवली आहेत. आता प्रेक्षकांची लाडकी मायरादेखील यावर थिरकली आहे.
‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतून मायराने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आणि सर्वांची शाबासकी मिळवली. तिचा निरागसपणा प्रेक्षकांना भावला. तिचे आई-वडील सोशल मीडियावरून मायराबद्दल अनेक गोष्टी चाहत्यांची शेअर करत असतात. नुकताच तिने ‘पठाण’ चित्रपटातील ‘झुमे जो पठाण’ या गाण्यावर धमाकेदार डान्स केला. मायराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनीदेखील यावर कमेंट्स केल्या आहेत.
‘पठाण’ चित्रपटामध्ये आता काही बदल करण्यात आले आहेत. यासोबतच तिकिटाचे दर पण कमी करण्यात आले आहेत. पण चित्रपटाची क्रेझ काही कमी होत नाही. ‘पठाण’ चित्रपटाने कमाईच्या बाबतीत अनेक नवे विक्रम रचले आहेत. महत्त्वाचं म्हणजे चित्रपटाने भारतात ५०० कोटींचा टप्पा गाठला आहे. ट्रेड ऍनालिस्ट रमेश बाला यांच्या मते ‘पठाण’ने जगभरात ८०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. तर, देशात ५०० कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपटाने प्रदर्शनाच्या १२व्या दिवसापर्यंत इतकी कमाई केली आहे.
दरम्यान, शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या भूमिका असलेला ‘पठाण’ चित्रपट २५ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला होता. चित्रपटाने पहिल्याच दिवशी ५७ कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. प्रदर्शनाच्या १३ दिवसानंतरही चित्रपट चांगली कमाई करत आहे.
Myra Vaikul Dance on Pathaan Movie Song Video