रोटरी क्लब ऑफ नाईन हिल्स आयोजक
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रोटरी क्लब ऑफ नाईन हिल्सतर्फे “माझी माय गोदा माय”या थीम अंतर्गत आयोजित छायाचित्र व चित्रकला स्पर्धेतील छायाचित्रे व चित्रांचे दोन दिवसीय प्रदर्शन सावानाच्या औरंगाबादकर सभागृहात भरविण्यात येणार आहे. त्याचे उद्घाटन शनिवार १२ नोव्हेंबरला महापालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते तसेच स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे आणि सावानाचे अध्यक्ष प्रा.दिलीप फडके यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असंल्याची माहिती क्लबचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी दिली.
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत गोदावरी नदीचे दोन्ही तट विकसित होत आहेत.तिच्या देखभाल व स्वच्छतेबाबत विविध माध्यमातून उलट सुलट चर्चा होत असतांनाच तिचे विहंगम दृष्य लोकांसमोर मांडण्याच्या सकारात्मक दृष्टीकोनातून ‘माझीमाय गोदमाय’ अशी अभिनव छायाचित्र आणि चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.त्याला उदंड प्रतिसाद लाभला.या प्रदर्शनामुळे गोदावरीचे सौंदर्य लोकांसमोर तर येईलच परंतु तिच्या स्वछता व संवर्धनाने महत्वही लोकांना पटेल. सुंदर छायाचित्रे तसेच लहान मुले व प्रथितयश चित्रकारांनी रेखाटलेल्या चित्रांमुळे स्मार्टसिटी अंतर्गत सुरु असलेल्या गोदा संवर्धन तसेच नमामि गोदा उपक्रमाला चालना मिळेल व पर्यटनाला हातभार लागेल,असा विश्वासही बेळे यांनी व्यक्त केला.
हे प्रदर्शन १२ आणि १३ नोव्हेंबर असे दोन दिवस सकाळी ११ ते सायंकाळी ८ वाजे पर्यंत नागरिकांना बघण्यास खुले राहणार आहे.बक्षीस वितरण हया कालावधीत व होणार आहे.उद्घाटन आणि पारितोषिक वितरण सोहळ्यास अनेक मान्यवर अतिथी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत, या प्रदर्शनाला नाशिककर नागरिकांनी, सावाना सभासद, रोटरी मेंबर,यांनी अवश्य भेट देण्याचे आवाहन सावानाचे अध्यक्ष प्रा.दिलीप फडके,रोटरी चे अध्यक्ष धनंजय बेळे,सावाना चे कार्याध्यक्ष गिरीश नातू,उपाध्यक्ष डॉ.विक्रांत जाधव,सुनील कुटे,प्रमुख कार्यवाह डॉ.धर्माजी बोडके,कार्यवाह ऍड.अभिजित बगदे तसेच रोटरी क्लब ऑफ नाईन हिल्सचे हेमंत खोंड, अजय चव्हाण, वैभव चावक, विश्वास शिंपी तसेच सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.