मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोरोना काळात बॉलीवूड चित्रपट उद्योगाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यातच लॉकडाऊन मुळे चित्रपटगृहे बंद असल्याने आता व्यवसायिकांनी आणि प्रेक्षकांनी मनोरंजनाचा वेगळा मार्ग शोधून काढला आहे. त्यामुळे ओटीटी कंटेंटला गेल्या काही वर्षांत भरभराट मिळाली आहे, नवीन कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्या असतानाच, बोल्डनेस आणि हॉट सीन्सची संख्याही वाढली आहे. सध्या प्रेक्षकांसाठी अनेक OTT प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत, या सगळ्यात MX Player ला देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, पण या प्लॅटफॉर्मवर काही वेब सिरीज अशा आहेत की, ज्या तुम्ही कुटुंबासह पाहू शकत नाहीत.
माया:
अभिनेत्री शमा सिकंदर अनेकदा सोशल मीडियावर तिच्या बोल्ड स्टाईलने प्रेक्षकांची मने जिंकते, तर माया या वेब सीरिजमध्येही तिची हॉट स्टाइल पाहायला मिळाली होती. माया ही विक्रम भट्ट यांनी तयार केली आहे, ज्यामध्ये शमाने तिचा अभिनय केला होता.
हॅलो मिनी:
हॅलो मिनीच्या कथेने एकीकडे प्रेक्षकांना भुरळ घातली, तर दुसरीकडे तिच्या बोल्ड सीन्सचीही खूप चर्चा झाली. या मालिकेत प्रिया बॅनर्जी, अर्जुन अनेजा, गौरव चोप्रा, मृणाल दत्त, अनुजा जोशी आणि अंकुर राठी प्रमुख भूमिकेत होते.
मस्तराम:
एमएक्स प्लेअरची ही यादी ‘मस्तराम’ शिवाय अपूर्ण आहे. बोल्ड सीन्स आणि कामुक दृश्यांमुळे मस्तराम रिलीजच्या वेळी खूप चर्चेत होता. भोजपुरी अभिनेत्री राणी चटर्जीने मस्तराममध्ये काम केले आहे.
पेइंग गेस्ट:
स्वस्तिका मुखर्जी स्टारर पेइंग गेस्टमध्ये खूप बोल्ड कंटेंट पाहायला मिळेल. 2017 मध्ये रिलीज झालेली ही वेब सिरीज तुम्ही कुटुंबासह पाहू शकत नाही. या मालिकेचे आतापर्यंत चार सीझन आले आहेत.
मोंटू पायलट:
मोंटू पायलट ही बंगाली वेबसिरीज एका अशा माणसाची कथा आहे जो पायलट बनण्याची आकांक्षा बाळगतो पण नशिबाने काहीतरी वेगळेच स्वीकारले. या मालिकेत माणसाचा संघर्ष दाखवण्यासोबतच अनेक बोल्ड सीझनही पाहायला मिळणार आहेत.
कॅरेक्टरलेस:
कॅरेक्टरलेस वेब सिरीज तुम्ही चुकूनही कुटुंबासह पाहू शकत नाही. या मालिकेत खूप बोल्ड सीन्स आहेत, असं म्हणता येईल की या मालिकेत बरीच हॉटनेस जोडली गेली आहे….
बुलेटस्:
बॉलीवूडची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री सनी लिओन आणि करिश्मा तन्ना या आजकाल लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत होत्या, बुलेट या वेबसिरीजमध्ये एकत्र दिसल्या होत्या. अॅक्शन आणि बोल्डनेसने भरलेली ही वेब सिरीज एकट्याने पाहिली तर बरे होईल.
डॅमेज्ड:
अमृता खानविकर आणि करीम हाजी स्टारर डॅमेज्डमध्ये एकीकडे तुम्हाला खूप सस्पेन्स पाहायला मिळणार आहे तर दुसरीकडे अनेक बोल्ड सीन्सही पाहायला मिळणार आहेत.