नाशिक ( इंडिया दर्पण वृत्तसेवा) –रयत शिक्षण संस्थेनंतर राज्यात दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी शिक्षण संस्था असलेल्या मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत अखेर परिवर्तनच्या दिशेन मतदारांनी कौल दिला असून अॅड. नितीन ठाकरे यांच्या पॅनलचे २१ पैकी २० उमेदवार विजयी झाले. तर सत्ताधारी नीलिमा पवार यांच्या प्रगती पॅनलचे अध्यक्षपदाचे उमेदवार डॅा. सुनील ढिकले सोडल्यास सर्वच उमेदवारांचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत सर्वाधिक महत्त्वाच्या असणा-या सरचिटणीसपदाच्या जागेवर अॅड. नितीन ठाकरे यांनी ५ हजार ३९६ मते मिळवत विजय मिळवला तर नीलिमाताई पवार यांना ४ हजार १३५ मते मिळाली. १२६१ मतांची आघाडी घेत ठाकरे यांनी मागील पराभवाचा वचपा काढला. तर दुसरीकडे या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी असलेले परिवर्तन पॅनलेचे उमेदवार आमदार अॅड. माणिकराव कोकाटे यांचा पराभव झाला. या निवडणुकीत रात्री उशीरापर्यंत काही जागेसाठी फेरमतमोजणी सुध्दा सुरु होती. त्यामुळे एखादा निकाल बदलण्याची शक्यता आहे. फेरमतमोजणीमुळे अधिकृत निकाल अद्याप आलेला नसला तरी कल स्पष्ट झाला आहे.
येत्या २८ ऑगस्ट रोजी होणा-या या निवडणुकीत परिवर्तनाची नांदी दिसेल असा स्पेशल ग्राऊंड रिपोर्ट याअगोदरच इंडिया दर्पणने प्रकाशित केला होता. हा रिपोर्ट या निवडणुकीत तंतोतंत खरा ठरला आहे. सत्ताधारी प्रगती पॅनलच्या नीलिमा पवार यांच्या नेतृत्वातील गटाला या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. सत्ताधाऱ्यांच्या गतीला नाराजीचा ब्रेक बसणार असल्याचे संकेत मतदारांकडून मिळत होते. त्यात या निवडणुकीत नाती गोती, संबध, राजकीय नेत्यांची भूमिका, वाढलेले मतदार, या गोष्टीचा परिणाम झाल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. बदल्यामुळे कर्मचा-यांचा राग सत्ताधारी पॅनल विरोधात दिसून आला.
या निवडणुकीत नीलिमा पवार यांच्या सत्ताधारी गटाला मतदारांच्या नाराजीची जाणिव अगोदरच झाल्यामुळे त्यांनी सुद्धा कंबर कसली होती. ती दूर करण्याच्या दिशेने त्यांनी अनेक पाऊल उचलली. त्यासाठी जोरदार प्रयत्नही केले. पण, तरी संपूर्ण नाराजी दूर करण्यात त्यांना यश आले नाही. तर दुसरीकडे अॅड. नितीन ठाकरे यांच्या नेतृत्वातील परिवर्तन पॅनल काँटे की टक्कर दिली. गेल्या निवडणुकीत अॅड. नितीन ठाकरे यांच्या पॅनलचा निसटता पराभव झाला होता. पण, त्यानंतर त्यांनी पाच वर्ष सातत्याने मतदारांशी ठेवलेला संपर्क व त्याचबरोबर संस्थेच्या कामावर ठेवलेली करडी नजर त्यांना या निवडणुकीत फायदा देऊन गेली. गेल्या निवडणुकीत त्यांचे पॅनल कमकुवत होते, पण, यावेळेस अनेक दिग्गज त्यांच्या पॅनलमध्ये असल्यामुळे त्यांच्या पॅनलचा विजय झाला आहे. या निवडणुकीत माजी सरचिटणीस कै. डॅा. वसंत पवार यांचे सख्खे दाजी डी.बी. मोगल हे ठाकरे यांच्या पॅनलमधून उपसभापती झाले.
हा कर्मवीरांच्या विचारांचा विजय
हा कर्मवीरांच्या विचारांचा विजय असून गेल्या पाच वर्षापासून संस्थेत सुरू असलेला मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार तीन सरचिटणीसांचं सरकार आणि कर्मचाऱ्यांवर होणारा अत्याचार हा मोठ्या प्रमाणावर फोफावला होता.सभासदांनी ही निवडणूक हातात घेतली होती.झालेला विजय माझा नसून सर्वांचा आहे. संस्था कशी उंच भरारी घेईल हाच अजेंडा डोळ्यासमोर ठेऊन काम करेल.उतणार नाही मातणार नाही आणि घेतलेला वसा टाकणार नाही.
ॲड.नितीन बाबुराव ठाकरे, सरचिटणीस मविप्र नाशिक
हे आहेत विजयी उमेदवार
अध्यक्ष –
डॅा. सुनील उत्तमराव ढिकले (प्रगती) – (विजयी) – ४९३७
ॲड.कोकाटे माणिकराव शिवाजीराव (परिवर्तन) – ४६२८
उपाध्यक्ष –
मोरे विश्वास बापूराव (परिवर्तन) – (विजयी) – ४९६८
दिलीप तुकाराम मोरे(प्रगती) – ४४९४
सभापती –
क्षीरसागर बाळासाहेब रामनाथ (परिवर्तन) – (विजयी) – ५२२५
माणिकराव माधवराव बोरस्ते(प्रगती) – ४३४६
उपसभापती –
मोगल देवराम बाबुराव (परिवर्तन) -(विजयी) – ५०४२
डॅा. विलास केदा बच्छाव(प्रगती) – ४३७१
सरचिटणीस –
ॲड. ठाकरे नितीन बाबुराव (परिवर्तन) – (विजयी) – ५३९६
नीलिमाताई वसंतराव पवार(प्रगती) – ४१३५
चिटणीस –
दळवी दिलीप सखाराम (परिवर्तन) – (विजयी) – ५१४६
डॅा. प्रशांत पाटील(प्रगती) – ४४११
तालुका प्रतिनिधी
नाशिक ग्रामीण –
पिंगळे रमेश पांडुरंग (परिवर्तन) – (विजयी) – ४९९५
सचिन पंडितराव पिंगळे(प्रगती) – ४६०४
येवला –
बनकर नंदकुमार बालाजी (परिवर्तन) – (विजयी) – ५२६०
माणिकराव माधवराव शिंदे(प्रगती) – ४३३४
सिन्नर –
भगत कृष्णाजी गणपत (परिवर्तन) – (विजयी) – ५१७९
हेमंत विठ्ठलराव वाजे(प्रगती) – ४१६१
मालेगाव –
ॲड. बच्छाव रमेशचंद्र काशिनाथ (परिवर्तन) – (विजयी)- ५०६६
डॅा. जयंत पवार(प्रगती) – ४५२८
देवळा –
पगार विजय पोपटराव (परिवर्तन) – (विजयी) – ४८८५
केदाजी तानाजी आहेर(प्रगती) – ४६५२
चांदवड –
डॉ. गायकवाड सयाजीराव नारायणराव (परिवर्तन) -(विजयी) -५१३७
उत्तमबाबा भालेराव(प्रगती) – ४४४१
नांदगाव –
पाटील (बोरसे) अमित उमेदसिंग (परिवर्तन) – (विजयी) -५०१८
चेतन मनसुखराव पाटील(प्रगती) – ४५५१
सटाणा
प्रसाद सोनवणे (परिवर्तन) – (विजयी) – ४९७९
विशाल सोनवणे(प्रगती) – ४५३५
नाशिक शहर –
लांडगे लक्ष्मण फकिरा (परिवर्तन) – (विजयी) – ५०२३
नानासाहेब महाले(प्रगती) – ४५३१
निफाड –
गडाख शिवाजी जयराम (परिवर्तन) – (विजयी) – ५२५१
दत्तात्रय निवृत्ती गडाख(प्रगती) – ४२७८
दिंडोरी –
जाधव प्रवीण एकनाथ (परिवर्तन) – (विजयी) – ५४८५
सुरेश कळमकर (प्रगती) – ४०७२
कळवण –
देवरे रवींद्र शंकर (परिवर्तन) – (विजयी) – ५१२६
धनजंय पवार (प्रगती) – ४४०५
इगतपुरी –
गुळवे संदीप गोपाळराव (परिवर्तन) – (विजयी) – ५२६२
भाऊसाहेब खताळे (प्रगती) -४२६१
महिला राखीव गट
१) बोरस्ते शोभा भागवत -(विजयी) – परिवर्तन – ५१२८
२) सोनवणे शालन अरुण –(विजयी) -परिवर्तन – ४४०२
३)सिंधुताई मोहनराव आढाव – ३७७८
४) सरला गुलाबराव कापडणीस – ३९०१
सेवक संचालक
संजय खंडेराव शिंदे (सेवक) – ३९८ (विजयी)
डॅा. संपतराव काळे – ९४
इंद्रजित दयाराम शिंदे – (सेवक) – ३३९ (विजयी)
रामराव बच्छाव – १०२
जगन्नाथ मधुकर निंबाळकर (सेवक)- २३३ (विजयी)
राजेश शिंदे – १११