नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कर्मवीर, समाजधुरींनी अडचणींच्या काळात मविप्र संस्थेची मजबूत पायाभरणी करत संस्था नावारूपाला आणली. मात्र, आता कोपरगावच्या धर्तीवर कुटुंब केंद्रीत व्यक्तींकडून संस्थेचा कारभार हाकला जात आहे.जिल्हयापेक्षा जिल्हयाबाहेरील बाहयशक्ती संस्थेत घुसू पाहत आहे.यासाठी सभासदाच्या हक्काच्या संस्थेला कुटुंब केंद्रीकरणापासून वाचविण्यासाठी परिवर्तन करावे असे आवाहन जेष्ठ नेते अंबादास बनकर यांनी केले.
परिवर्तन पॅनलचा येवला,नांदगाव,मालेगाव तालुका दौरा रविवारी संपन्न झाला झाला. यावेळी बोलताना बनकर म्हणाले की नितीन ठाकरे यांचा वारसा समृद्ध असून कर्मवीर बाबुराव ठाकरे यांच्या बावीस वर्षांच्या कार्यकाळात अनेक घराचे उध्दार झाले.त्यांनी कधीही प्रांतवाद केला नाही त्यांचाच समृद्ध वारसा नितीन ठाकरे यांच्या रूपाने संस्थेत निवडून जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.सभेचे अध्यक्ष कारभारी बोरनारे होते. नांदगाव येथे झालेल्या सभेत माजी संचालक साहेबराव पाटील यांनी अमित पाटील यांच्या रूपाने तरुण चेहऱ्याला संधी दिल्याबद्दल नितीन ठाकरेंचे आभार मानले.नगराध्यक्ष व्यंकट आहेत, राजेश कवडे,विश्वासराव कवडे, चंद्रसेन आहेर,उमाकांत थेटे,बाळासाहेब कवडे,योगेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. मालेगाव तालुक्यात दाभाडी,पिंपळगाव, वडनेर खाकूर्डी, सौंदाने येथे झालेल्या परिवर्तन सभा संपन्न झाली.यावेळी मालेगावचे उमेदवार आर. के बच्छाव यांनी सांगितले की संस्थेने गेल्या महिन्यात झालेल्या इमारत उद्घटनात संस्थेने जुन्याला नवीन रंग देत सभासदांची दिशाभूल केली असून त्यामुळे यावेळी परिवर्तन पॅनलच्या पाठीशी मतदार खंबीर उभे असल्याचे सांगितले.
संस्थेला कर्जाच्या खाईत लोटण्याचा घाट
पॅनलचे नेते ॲड नितीन ठाकरे यांनी गेल्या पाच वर्षात प्रत्येक सभासदापर्यंत पोहोचून भावना जाणून घेतल्या असल्याचे सांगून येवला,नांदगाव सह मालेगावकर यावेळी खोट्या भूलथापांना बळी न पडता परिवर्तन घडवतील असा विश्वास व्यक्त केला.तुषार शेवाळे यांच्या तालुक्यात परिवर्तन पॅनलला मिळत असलेला प्रतिसाद बघता सरचिटणीस व त्यांच्या उमेदवारांचा पराभव अटळ असल्याचे सांगितले.सरचिटणीस यांनी सभासदांना खोटे फुगीव आकडे सांगून दिशाभूल करीत असून यांनी स्वतःचे घर भरून संस्थेला कर्जाच्या खाईत लोटण्याचा घाट घातला आहे.
नीलिमाताईंच्या आरोपांवर कोकटेंचे सडेतोड उत्तर
गंगापुर रोड नाशिक येथील सर्व्हे नं ६९१ ही वाघ गुरुजी शाळेलगतची जागा दिनांक ४ जानेवारी २०१० रोजी शासनाकडून गायरान असलेली जागा शिवसरस्वती शिक्षण संस्था, सोमठाणे या नावाने घेतली. त्यानंतर सुमारे नऊ महिन्यानंतर डॅा. वसंत पवार यांचे निधन झाले. विशेष म्हणजे जेव्हा ही जागा शिवसरस्वती शिक्षण संस्थेने मागणी केली, तेव्हा व त्यापुर्वी कुणीही या जागेची मागणी केलेली नव्हती. कारण त्याजागेवर नाशिक महानगर पालिकेने आरक्षण टाकलेले होते. विशेष म्हणजे वाघ गुरुजी शाळेच्या जागेवरही आरक्षण टाकलेले होते. ही जागा शिवसरस्वती शिक्षण संस्थेला शासनाने वितरित केली. त्या जागेवरील आरक्षण बदलण्याचा प्रस्ताव शासनाकडे दाखल केला. त्यावेळेस वाघ गुरुजी शाळेच्या जागेचे देखील आरक्षण बदल करण्यासाठी आपण स्वत: पाठपुरावा करुन २४ सप्टेंबर २०१३ रोजी एकत्रित गॅझेट काढुन आणले. आता या माध्यमातून आपल्यावर शिंतोडे उडवून काय उपयोग? त्याऐवजी माझ्यासह माझे सर्व सहकारी एवढे आरोप जाहीरपणे करीत आहे, त्याचे उत्तर का देत नाही? संस्थेमध्ये डोईजड कुणी नको असल्याने खोटे आरोप करून मतदारांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण त्याचा काही उपयोग होणार नाही, कारण ‘मविप्र’च्या सभासदांनी ‘परिवर्तन’चा निर्णय घेऊन टाकला आहे. जिल्हा बँक बुडविल्याचा आरोप आपल्यावर ‘मविप्र’च्या राजकारणाच्या माध्यमातून केला जातो. परंतु त्यावेळी केदा आहेर जिल्हा बँकेचे चेअरमन होते, हे कसे काय विसरतात? तसेच निफाड सहकारी साखर कारखाना पूर्णपणे डबघाईस गेला, त्यावेळी कारखान्याचे चेअरमन माणिकराव बोरस्ते होते, हे विसरले काय? असा परखड सवाल त्यांनी उपस्थित केला.