नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत परिवर्तन पॅनलने मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बुधवारी मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार व सभापती माणिकराव बोरस्ते यांच्या नेतृत्वाखाली प्रगती पॅनलने शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. या दोन्ही पॅनलने उमेदवारी अर्ज भरतांना केलेल्या शक्तीप्रदर्शनामुळे या निवडणुकीत चुरस वाढली आहे.
प्रगती पॅनलने सुश्रुत हॉस्पिटलपासून रॅलीव्दारे सभासदांनी रॅली काढीत मविप्रच्या मध्यवर्ती कार्यालयात जात उमेदवारी अर्ज दाखल केले. मविप्रचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, सरचिटणीस नीलिमा पवार, सभापती माणिकराव बोरस्ते, श्रीराम शेटे,आ. राहुल ढिकले, आ. राहुल आहेर, सुरेश बाबा पाटील, ज्येष्ठ नेते रामचंद्र बापू पाटील, डॉ. सुनील ढिकले, केदा आहेर, दिलीप मोरे, विलास बच्छाव, भाऊसाहेब खताळे यासह मोठ्या संख्येने सभासद व नेते उपस्थितीत होते. श्रद्धा लॉन्स येथे सभासदांचा जिल्हा मेळावा श्रेष्ठ नेते श्रीराम शेटे यांच्या अध्यक्षतेखाली झाला.