नाशिक – नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेची पंचवार्षिक निवडणूक २८ ऑगस्टला होणार आहे. त्यासाठी आज निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. ५ ऑगस्टपासून उमेदवारी अर्ज उपलब्ध होणार असून उमेदवारी अर्ज ७ ते ११ ऑगस्ट दरम्यान स्वीकारले जाणार आहे. त्यानंतर २८ ऑगस्टला मतदान, तर २९ ऑगस्टला मतमोजणी होणार आहे. मविप्र संस्थेच्या कार्यकारिणी मंडळाची मुदत ऑगस्टमध्ये संपत असल्याने ही निवडणूक होणार आहे.
२०२२ ते २०२७ या कालावधीसाठी ही संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक होणार असून यावेळेस ती चुरशीची असणार असल्याचे बोलले जाते. या निवडणुकीसाठी सभासदांसाठी मतदार याद्या, घटना व निवडणूक नियमावली निवडणूक मंडळ कार्यालयात विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. १५ ऑगस्ट ही सार्वजनिक सुटी वगळता इतर सुट्यांच्या दिवशी निवडणूक कार्यालयातील कामकाज सुरू राहणार असल्याचेही सांगण्यात आले. या निवडणुकीसाठी निवडणूक मंडळाचे अध्यक्ष म्हणून अॅड.भास्करराव चौरे यांना संस्थेतर्फे नेमणूक पत्र देण्यात आले. निवडणूक मंडळामध्ये सचिव म्हणून डॉ.डी.डी. काजळे हे काम पाहणार आहे. तर सदस्य म्हणून अॅड. रामदास खांदवे, अॅड. महेश पाटील हे त्यांना सहकार्य करणार आहेत.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
उमेदवारी अर्ज दिले जातील – ५ ते ११ ऑगस्ट २०२२
उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची मुदत – ७ ते ११ ऑगस्ट २०२२
उमेदवारी अर्ज दिले जातील – ५ ते ११ ऑगस्ट २०२२
उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची मुदत – ७ ते ११ ऑगस्ट २०२२
उमेदवारी अर्जाची छाननी – १२ ऑगस्ट २०२२
लवादाकडे अपिलाची मुदत – १३ व १४ ऑगस्ट २०२२
लवादाने निर्णय देण्याची मुदत – १६ ऑगस्ट २०२२
पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध – १६ ऑगस्ट २०२२
उमेदवारी मागे घेण्याची मुदत – १९ ऑगस्ट २०२२
उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्धी -१९ ऑगस्ट २०२२
उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप – १९ ऑगस्ट २०२२