नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या वार्षिक सभेत खासगी विद्यापीठाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राडा झाला. या सभेत सत्ताधारी व विरोधक आमने सामने आल्यामुळे प्रचंड गोंधळ निर्माण झाला. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये थेट व्यासपीठावरच धक्काबुक्की आणि बाचाबाची झाली.
खासगी विद्यापीठ हेच संस्थेसाठी फायदेशीर असल्याची सत्ताधाऱ्यांची भूमिका होती. तर तर क्लस्टर विद्यापीठ हेच संस्थेतील लोकशाही पद्धतीला जिवंत ठेवणार असल्याचा विरोधकांचा दावा होता. यावेळी विरोधकांनी खासगी विद्यापीठ निर्मितीला पूर्णपणे विरोध केला.
वार्षिक सभेत सत्ताधारी गटाने विद्यापीठ स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला. त्याला विरोधकांनी जोरदार विरोध केला. त्यानंतर सत्ताधा-यांकडून विरोधातच हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. तर विरोधकांनी हा प्रस्ताव नाकारला. त्यामुळे गोंधळातच ही सभा आटोपती घ्यावी लागली.
दरम्यान आज सकाळी शरद पवार यांची नाशिकमध्ये संस्थेचे संस्थेचे अध्यक्ष सुनील ढिकले यांनी भेट घेतली. यात विरोधकांची भूमिका त्यांनी मांडली तर सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांनीही पवरा यांची भेट घेऊन सत्ताधारी गटाची भूमिका मांडली.