मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात सत्ता आणि राजकीय नाट्य सुरू असताना राज्य सरकारने तीन सनदी अधिकाऱ्यांची बदली केली आहे. त्यात औरंगाबाद सिडकोच्या मुख्य प्रशासक दीपा मुधोळ-मुंडे या आता सांगलीच्या जिल्हाधिकारी असतील. औरंगाबादचे महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांची औरंगाबाद सिडको मुख्य प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांची औरंगाबाद महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
MVA Government IAS Officer transfer