मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याची संधी शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडची जबरदस्त कामगिरी झाली आहे. गेल्या दोन वर्षांमधील परतावा पाहिला तर, ९ मार्चपर्यंत इक्विटीमध्ये आयसीआयसीआय प्रुडेन्शियलच्या सर्व योजनांनी २५ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.
आयसीआयसीआयच्या ब्लूचिप फंडने २६.५३ टक्के, लार्ज आणि मिड कॅप फंडने ३०.५२ टक्के, मल्टिकॅप फंडने २६.१९ टक्के, इंडिया ऑपोच्युनिटीज फंडने ३९.८७ टक्के, व्हॅल्यू डिस्कव्हरी फंडने ३९.१३ टक्के, फोकस्ड इक्विटी फंडने ३१.८१ आणि डिव्हिडेंड यील्ड इक्विटी फंडने ३९.२३ टक्क्यांचा परतावा दिला आहे. तर याच्या हायब्रीड योजनांमध्ये इक्विटी अँड डेट फंडने याचदरम्यान ३२.९३ टक्के, मल्टि असेट फंडने ३१.६१ टक्के, असेट अलोकेटर फंड ऑफ फंडने १८.५९ टक्के आणि बॅलेन्स्ड अॅडव्हांटेज फंडने १६.९१ टक्क्यांचा परतावा दिला आहे.
तज्ज्ञ सांगतात की, आम्ही भारतातील विकास कथेबाबत सकारात्मक आहोत. गुंतवणूकदारांनी अशा काळात सिस्टिमॅटिक गुंतवणूक इक्विटी आणि डेट फंडमध्ये मालमत्तेचे वाटप करणे आवश्यक आहे. मार्केट सेगमेंटमध्ये मिड, स्मॉल कॅपच्या तुलनेत लार्ज कॅप सरस ठरणार आहेत. गेल्या सहा महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारात १५.४१ अब्ज डॉलरचे शेअर्स विक्री केले आहेत. हा २००८ सालानंतरचा सर्वात मोठा आकडा आहे. बहुतांश गुंतवणूकदार लार्ज कॅपमध्ये गुंतवणूक करतात.
गुंतवणूक सल्लागारांचे मत आहे की, इक्विटीचा दृष्टिकोन दीर्घकाळ सकारात्मक असतो. २००८ चे संकट असो, २०२० मधील संकट असो अथवा आताचे संकट असो. शेअर बाजार घसरणीतून वेगाने बाहेर पडतो. अशा बहूमालमत्ता योजना आगामी काळात चांगला परतावा देऊ शकतात. इक्विटी सेगमेंटचे गुंतवणूकदार आगामी दोन-तीन वर्षांच्या आधारावर गुंतवणूक करतात. रशिया-युक्रेन युद्ध थांबल्यानंतर बाजारात पुन्हा तेजीचे वातावरण दिसेल. तथापि, वाढत्या कच्च्या तेलाच्या किमती भारतासाठी चिंताजनक आहेत. मार्च २०२० पासून भारतीय बाजाराने चांगले पुनरागमन केले आहे.