मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पारंपारिक गुंतवणूक योजनांपेक्षा म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखमीची मानण्यात येते. बचत खाते, आवर्ती ठेव, मुदत ठेव योजनांमध्ये गुंतवणूक करता येते. त्यात रिस्क नाही. पण परतावा म्युच्युअल फंड इतका मोठा मिळत नाही. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणानुसार बँका व्याजदर निश्चित करतात. त्याआधारे परतावा मिळतो. पण म्युच्युअल फंड हा बाजारावर आधारीत असतो. धोका असला तरी फायदा ही भरपूर मिळतो. कोणतेही महत्त्वाचे काम वेळेवर पूर्ण करणे गरजेचे असते. त्यातच मार्च महिना म्हणजे आर्थिक वर्षाचे इअर एन्डींग समजले जाते. दैनंदिन कामकाज करत असताना आपली कागदपत्रे किंवा शासकीय कामकाजाची संबंधित कोणत्याही योजनांची माहिती वेळेवर भरली तर ऐनवेळी धावपळ होत नाही, हेही तितकेच खरे आहे. त्यामुळे ही कामे ३० सप्टेंबरपूर्वी पूर्ण करावीत, अन्यथा खूप नुकसान होऊ शकते.
सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे गुंतवणूक केल्यास परतावा चक्रव्याढ व्याजाच्या आधारे मिळत असल्याने तो कैकपटीने वाढतो आणि गुंतवणूकदाराला मोठा फायदा होतो. तसेच एकदाच मोठी रक्कम गुंतवण्याची गरज नसते. दर महिन्याला ठराविक रक्कम हप्त्याच्या रुपात बँक खात्यातून कपात होते. कारण म्युच्युअल फंड हे शेअर बाजारात पैसे गुंतवण्याचा एक लोकप्रिय मार्ग आहे. यात गुंतवणूकदारांना शेअर बाजारातील तेजीचा फायदा तर होतोच, पण पोर्टफोलिओ वैविध्यपूर्ण असल्याने तोटाही कमी होतो. याशिवाय चांगले शेअर्स शोधण्याच्या कामातूनही तुमची सुटका होते. यामुळेच म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांची संख्या सातत्याने वाढत आहे. म्युच्युअल फंड गुंतवणूकदार असाल तर आपल्याला तातडीने महत्त्वाचे काम करावे लागणार आहे.
सेबीचे परिपत्रक
महत्त्वाची बाब म्हणजे बाजाराचे नियमन करणारे प्राधिकरण सेबीने म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मार्च महिन्यात एक परिपत्रक जारी केले होते. परिपत्रकानुसार, म्युच्युअल फंड धारकांना नॉमिनी नाव नोंदणी करण्यासाठीची मुदत निश्चित केली होती. ३० सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे. ही मुदत संपण्यास आता दोन आठवड्यांचा अवधी शिल्लक आहे. तसेच यापूर्वी ही मुदत ३१ मार्च रोजी संपली होती. त्यानंतर सेबीने मागील वर्षी १५ जून २०२२ रोजी या संदर्भात सर्वप्रथम एक परिपत्रक जारी केले होते, त्यात ३१ मार्च २०२३ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर सेबीने २८ मार्च रोजी नवीन परिपत्रक जारी केले आणि ३० सप्टेंबरपर्यंत मुदत वाढवली आहे, असे सेबीने स्पष्ट केले होते.
हे टाळण्यासाठी दोन उपाय
दरम्यान, म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांनी नॉमिनीबाबत अंतिम मुदतीपर्यंत स्थिती स्पष्ट केली नाही, तर त्यांचे फोलिओ गोठवले जातील. म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना त्यांच्या फोलिओचे डेबिट फ्रीझिंग टाळण्यासाठी दोन उपाय आहेत. पहिला उपाय म्हणजे नामनिर्देशन सबमिट करणे म्हणजे एखाद्याला नॉमिनी बनवणे, तसेच दुसरा पर्याय म्हणजे नामांकन रद्द करणे, त्याचप्रमाणे कोणालाच नॉमिनी करायचे नसल्यास तसे जाहीर करावे लागेल. त्यासाठी एक फॉर्म भरून द्यावा लागेल. जर म्युच्युअल फंड एकापेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र खरेदी केला असेल, म्हणजेच खाते वैयक्तिक नसून संयुक्त असेल, तर अशा परिस्थितीत सर्व संयुक्त धारकांनी एकत्र येऊन नॉमिनी ठरवावे लागेल, असेही स्पष्ट केले आहे.
Mutual Fund Investment SEBI Order Finance