मनीष कुलकर्णी, इंडिया दर्पण वृत्तसेवा
म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही जर अजूनही तुमचे पॅन आधारशी लिंक केले नसेल, तर ३१ मार्च २०२२ पर्यंत करू घ्यावे. कारण असे केले नाही तर तुमचा पॅन क्रमांक निष्क्रीय होणार आहे. त्याचा थेट परिणाम म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीवर होणार आहे.
तुम्ही ठरलेल्या तारखेनंतरसुद्धा पॅन-आधारशी लिंक केले नाही, तर तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकणार नाहीतच, शिवाय आपले पैसेही काढू शकणार नाहीत. अशा प्रकारची गुंतवणूक करण्यासाठी पॅनकार्ड असणे अनिवार्य आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी ही बाब गंभीरतेने गरजेचे आहे. जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये पहिल्यांदा गुंतवणूक करत आहात, किंवा दुसऱ्या योजनेत पहिल्यांदा गुंतवणूक करण्याचे नियोजन करत आहात, तर तुमचे पॅनकार्ड वैध असणे आवश्यक आहे. म्युच्युअल फंडमधील गुंतणूकदार आहात, परंतु तुमचे पॅन अवैध झाले आहे, तर सध्या सुरू असलेल्या म्युच्युअल फंडात गुंतवणुकीत अतिरिक्त युनिट जोडले जाऊ शकणार नाहीत.
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला दस्ताऐवजीकरण प्रक्रियेतून जावे लागणार आहे. त्यामध्ये प्रथम तुम्हाला केवायसी निकषांचे पालन करावे लागेल. दुसरे म्हणजे तुमच्याकडे वैध पॅनकार्ड असणे आवश्यक आहे. त्यातच जर पॅन आधारशी लिंक नसल्याने पॅन निष्क्रीय झाल्यास तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकणार नाहीत. जर तुमचे पॅन अवैध झाले, तर सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) च्या माध्यमातून करण्यात येणारी गुंतवणूक थांबेल. म्हणजेच तुम्ही म्युच्युअल फंड योजनेत नवे युनिट जोडू शकणार नाहीत. म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक केली असेल, आणि तुमचे पॅन अवैध ठरल्यास तर तुम्ही पैसे काढू शकणार नाहीत. तसेच सिस्टिमॅटिक विदड्रॉवल प्लॅनही (SWP) थांबणार आहे.