बुधवार, सप्टेंबर 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

आषाढी वारीकरीता संत मुक्ताबाई पालखीचे मान्यवरांच्या उपस्थितीत बसने प्रस्थान

by Gautam Sancheti
जून 14, 2021 | 1:14 pm
in स्थानिक बातम्या
0
palkhi e1623676371244

जळगाव – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीसाठी महाराष्ट्र शासनाने परवानगी दिलेल्या मानाच्या दहा पालख्यांपैकी प्रथम निघणारी श्री संत मुक्ताबाई पालखीचा प्रस्थान सोहळा तापी तीरावरील श्री संत मुक्ताबाई समाधीस्थळ श्रीक्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर येथे आज जुने मुक्ताबाई मंदिर, कोथळी-मुक्ताईनगर येथे पार पडला. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह मोजके भाविक व मान्यवर उपस्थित होते.
आदिशक्ती संत मुक्ताबाई पालखी सोहळा, मुक्ताईनगर सोबत पंढरपूर येथे श्री. विठ्ठलाचे दर्शनासाठी आषाढी एकादशी वारीस पायी चालत जाण्याची ३१२ वर्षापासूनची परंपरा आहे. मध्यप्रदेश, खान्देश, विदर्भातील भाविक दिंड्यासह या सोहळ्यात सहभागी होत असतात. ७०० किमीचे अंतर ३३ दिवसात ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता पार पाडण्याची पिढ्यानपिढ्यांची परंपरा सुरु आहे. मात्र मागील वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरीकांच्या हितासाठी शासनाने निर्बंध घातल्याने ही वारी पायी न जाता बसने होत आहे. यावर्षीसुद्धा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये याकरीता महाराष्ट्र शासनाने संताच्या दहा मानाच्या पालख्यांना परवानगी दिली आहे. यात जळगाव जिल्ह्यातील संत मुक्ताबाई संस्थान कोथळी-मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाई पालखीचा समावेश आहे. या पालखीचे परंपरेनुसार जेष्ठ शु.४ ला प्रस्थानाचा सोहळा आज जुने मुक्ताबाई मंदिरात सकाळी मोजकेच वारकरी व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, माजीमंत्री एकनाथ खडसे, संस्थानचे अध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे-खेवलकर, पालखी सोहळा प्रमुख हभप. रविंद्र महाराज हरणे, उद्धव जुनारे महाराज, तहसिलदार श्वेता संचेती, पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार, नरेंद्र नारखेडे यांच्या उपस्थितीत पार पडला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या प्रस्थान सोहळ्याचे सोशल मीडियाद्वारे लाईव्ह प्रसारण करण्यात आले होते. यामुळे भाविकांना हा सोहळा घरबसल्या बघता आला. पालखी प्रस्थानानंतर पालखीचा मुक्काम हा नवीन मुक्ताबाई मंदिरात असणार आहे, याठिकाणी पालखीचे नित्योपचार पूजापाठ करण्यात येतील. शासनाच्या पुढील सुचनांनुसार पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होईल.
यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कोरोनापासुन मुक्ती मिळु दे अशी प्रार्थना संत मुक्ताई चरणी केली. माजीमंत्री एकनाथ खडसे यांनी मुक्ताई मंदिर परिसरात सुरु असलेल्या कामांची माहिती सांगून कामे लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी उर्वरित निधी मिळवून देण्याची मागणी पालकमंत्री पाटील यांचेकडे केली असता मुक्ताई मंदिर परिसरात सुरु असलेल्या कामांसाठी ग्रामविकास, पर्यटन व इतर विभागांकडे पाठपुरावा करुन आवश्यक तो निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पिंपळगाव बसवंत येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

हे आहे देशातील पहिले विजेशिवायचे सी पॅप (CPAP) उपकरण

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Corruption Bribe Lach ACB
क्राईम डायरी

१२ हजाराची लाच घेतांना दोन कॅान्स्टेबलसह एक जण एसीबीच्या जाळ्यात

सप्टेंबर 24, 2025
accident 11
क्राईम डायरी

अपघाताची मालिका सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातामध्ये दोन मोटारसायकल स्वारांचा मृत्यू

सप्टेंबर 24, 2025
mahavitran
संमिश्र वार्ता

आता वीजभार वाढीच्या ऑनलाइन अर्जांना स्वयंचलित मंजूरी

सप्टेंबर 24, 2025
Untitled 31
संमिश्र वार्ता

शेतकऱ्यांना केवळ ७ हजाराची मदत म्हणजे जखमांवर मीठ चोळण्यासारखे….डॉ.अजित नवले

सप्टेंबर 24, 2025
Election logo nivdnuk aayog e1702627232547
महत्त्वाच्या बातम्या

राज्यातल्या जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

सप्टेंबर 24, 2025
कबीर खंडारे जिप्सी1 1024x626 1
महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान….या तीन मराठी चित्रपटांचा गौरव

सप्टेंबर 24, 2025
tulja bhavani
संमिश्र वार्ता

इंडिया दर्पण नवरात्रोत्सव विशेष लेखमाला…तुळजापूरची श्री तुळजाभवानी

सप्टेंबर 24, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी प्रकृतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या,बुधवार, २४ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 23, 2025
Next Post
image3 e1623678228610

हे आहे देशातील पहिले विजेशिवायचे सी पॅप (CPAP) उपकरण

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011