इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – विवाह समारंभ ही प्रत्येकाच्या जीवनात महत्त्वाची घटना मानली जाते;, प्रत्येक जाती, धर्म आणि पंथ यामध्ये विवाह संबंधी वेगवेगळ्या प्रथा परंपरा आहेत, या परंपरेनुसार विवाह समारंभ पार पडतो. कालानुरूप त्यात बदल होत असले तरी काही प्रथा परंपरा कायम आहेत. प्रत्येक जण आपापल्या धर्मानुसार लग्नसमारंभातील धार्मिक विधी करण्याचा प्रयत्न करतो. परंतु काही वेळा विपरीत घडते आणि त्यातून धार्मिक तणाव निर्माण होतो. असा प्रकार कर्नाटकमध्ये झाला. मुस्लिम समाजातील युवक आणि हिंदू देवदेवतांची प्रमाणे कपडे परिधान केल्याने या गावात गावातील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.
कर्नाटकात एका लग्न समारंभात हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी वधू-वरांच्या नातेवाइकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेताळा पडनुरू गावातील रहिवासी चेतन याच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पोलिस सूत्रांनी सांगितले की, उप्पल येथील रहिवासी असलेल्या बासित याने रात्री कोलनाडू गावातील सालेथूर येथील अझीझ यांच्या घरी एका लग्न समारंभात मुस्लिम वराने स्थानिक हिंदू देवता कोरगज्जासारखे कपडे घातले होते.
या प्रकरणातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तुलुनाडू भागात झालेल्या लग्नात हा गैरप्रकार घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आरोपीने हिंदू देवतेप्रमाणे वेशभूषा करून धार्मिक भावनांचा अपमान तर केलाच, शिवाय मित्रांसोबत नाचून त्यांची खिल्लीही उडवली, असेही तक्रारीत म्हटले आहे. तसेच या वराचा डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.