इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मुस्लिम समाजात अद्यापही तीन तलाकची पद्धत प्रचलित आहे. अनेक कारणांवरून पती आपल्या पत्नीला तलाक देतात. एका महिलेच्या पतीने देखील अशाच वेगळ्या कारणाने पत्नीला तलाक दिला, त्यामुळे संसार उध्वस्त झाल्याने अखेर तिने आपल्या मित्राबरोबर दुसरा संसार थाटला. उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यात मुस्लीम महिला शहनाज ही भगवान श्रीकृष्णाची भक्ती करताना पाहिल्यानंतर पतीला राग अनावर झाला आणि त्याने तीन तलाक देत पत्नीला स्वत:पासून विभक्त केले.
लग्नानंतर दोन महिन्यातच भांडण
मुस्लीम तरूणी शहनाज ही फरीदपूरच्या ढाकनी गावातील रहिवाशी आहेत. हिंदू धर्मिय पवन हा शहनाज हिचा लहानपणापासूनचे मित्र आहेत. त्याच्या घरी जात असल्यामुळे, बालपणापासूनच शहनाज भगवान श्रीकृष्ण यांची भक्त होती. इतके नव्हे तर ती श्रीकृष्णाची पूजा करत असे, तेव्ह तिच्या कुटुंबीयांना अनेकदा तिला रोखले, तरीही ती कोणाचे ऐकत नव्हती. दरम्यान, सन २०१८ मध्ये शहनाजचे लग्न झाले होते. लग्नानंतर दोन महिन्यातच पतीसोबत श्रीकृष्ण भक्तीवरुन भांडण झाले. त्यावेळी, पतीने तिला तीन तलाक दिला. परंतु पतीसोबत झालेल्या वादानंतर सैहनाज आई-वडिलांच्या घरी आली. तेव्हा तिला वाटले की आई वडील तरी आपल्याला आधार देतील परंतु झाले, उलटेच आई-वडिल तसेच माहेरच्यांनीही अन्य मंडळींनी तिला बोलणे सुनावले. त्यांनी तिला कोणत्याही प्रकारे आधार दिला नाही.
आश्रमात जाऊन
पतीने शहनाजला तलाक दिला आई-वडिलांनी देखील तिच्याशी संबंध तोडले त्यामुळे आता काय करावे हेच तिला कळेना. त्यावेळी, शहनाजने आपल्या बालपणीचा मित्र पवनला आपले दु:ख सांगितले. त्यानंतर दोघे वारंवार भेटू लागले, पवन आणि शहनाज यांच्यात गाढ मैत्री झाली, दोघांनी एकमेकांना दु:ख सांगितले तर, पवनने शहनाजला आधार दिला, पुढे तिने पवनला आपला जीवनसाथी निवडले. दोघांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर, अगस्त्य मुनि आश्रमात जाऊन शहनाजने पवनसोबत हिंदू-रिती-रिवाजानुसार लग्न केले. त्याचप्रमाणे शहनाजने लग्नानंतर आपले नाव बदलले असून ती आता आरोही बनली आहे. आता तरी तीला भगवान श्रीकृष्णाची पूजा करण्यापासून कोणी रोखू शकत नाही.