मुंबई (इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क) – बॉलीवूड मधील कलाकार असो की गायक यांच्या संदर्भात सर्वांनाच उत्सुकता असते. या सेलिब्रिटींचे लग्न असो की, त्यांच्या मुला-मुलींचे लग्न समारंभ याबाबत सर्वांना खास माहिती हवी असते. त्याबाबत चर्चा देखील होत असते. सध्या देखील असेच एका लग्नाबद्दल चर्चा होत आहे. कारण एआर रहमानची मुलगी खतिजा रहमान हिने सोशल मीडियावर जाहीर केले आहे की, ती रियासदीन शेख मोहम्मदशी साखरपुडा केला आहे.
अनेक छायाचित्रांमध्ये रियासदीन शेख मोहम्मद आणि खतिजा रहमान दिसत आहेत. एआर रहमानची मुलगी खतिजा रहमान हिचे ऑडिओ इंजिनियर रियासदीन शेख मोहम्मदसोबत साखरपुडा झाला आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करून या संदर्भात अधिक माहिती दिली आहे.
विशेष म्हणजे खतिजा रेहमानने साखरपुड्याच्या दिवशी गुलाबी आणि चांदीचा ड्रेस परिधान केला होता. याशिवाय तिने दागिने, नेकलेसही आणि मॅचिंग मास्क देखील घातला होता. सोबतच तिने ब्लॅक अँड व्हाइट आउटफिट घातला होता. तसेच खतिजा रहमानने फोटो शेअर करत लिहिले की, ‘मी जाहीर करत आहे की मी रियासदीन शेख मोहम्मद जो एक नवोदित उद्योगपती आणि ऑडिओ इंजिनियर आहे त्यांच्याशी साखरपुडा केला आहे. हा साखरपुडा माझ्या वाढदिवसानिमित्त आहे. माझ्या कुटुंबातील सदस्य व नातेवाईकांच्या उपस्थितीत झाला.
आता खतिजा रहमानच्या फोटोवर अनेकांनी प्रतिक्रिया देल्या आहेत. हर्षदीप कौरने तिचे अभिनंदन केले आहे. श्वेता पंडित हिने देखील अभिनंदन केले आहे. खतिजा रेहमानने नुकतेच तिच्या वडिलांसोबत एका कॉन्सर्टमध्ये परफॉर्म केले आहे. एआर रहमानने आपल्या मुलीचे वर्णन करताना सांगितले की, खतिजा आणि रहिमा या माझ्या खूप कणखर आणि चांगल्या मुली आहेत. त्या काहीही करू शकतात.