नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेली अनेक दशके सिनेरसिकां च्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे चोखंदळ संगीतकार मदन मोहन यांच्या कालातीत संगीत प्रवासाच्या आठवणी दृकश्राव्य माध्यमातून त्यांचे सुपुत्र संजीव कोहली उलगडणार आहेत. यशराज फिल्म्स चे संचालक असणाऱ्या संजीव कोहली यांनी सिने जगतातील दिग्गजांनी सांगितलेल्या आठवणी ,दुर्मिळ कंपोजिंग सेशन्स, त्यावर मदन मोहन यांच्या टिप्पणी ,आणि त्यांच्या १०० अजरामर गाण्यां च्या क्लिपिंग्ज , विविध छायाचित्रां चा वापर करुन “दिल ढूंडता है” हा ३ तासां चा अविस्मरणीय कार्यक्रम तयार केला आहे.
आपल्या वडिलांचे चाहते फक्त मुंबईतच नाहीत तर लहान गावातही आहेत ही जाण ठेवून रसिकांकरिता हा कार्यक्रम नाशिकला शंकराचार्य न्यास यांचे सहयोगाने शनिवार दि ११ जून रोजी ते पुन्हा सादर करणार आहेत. सर्व रसिकांना मुक्त प्रवेश असणारा हा कार्यक्रम कुर्तकोटी सभागृह , शंकराचार्य संकुल येथे ठीक ६ वा सुरु होईल असे शंकराचार्य न्यासातर्फे कळवण्यात आले आहे.