मुंबई – एकेकाळी म्हणजे ९० च्या दशकात संगीत जगातील सर्वात प्रसिद्ध नदीम-श्रवण जोडी सर्वांनाच माहित होती. कारण त्यावेळी त्यांच्या संगीताला खूप मागणी होती आणि सर्व संगीतप्रेमी हे नदीम-श्रावणबद्दलच बोलत असत. यापैकी एक असलेले प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक श्रवण कुमार राठोड यांचे आज दि. २३ एप्रिल रोजी सकाळी निधन झाले. श्रवण राठोड यांना कोरोना विषाणूची लागण झाली होती. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना मुंबईतील माहीम येथील हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत होते.
आशिकी, दिवाना, बरसात, धडकन अशा ९० च्या दशकामधील अनेक चित्रपटांना त्यांनी संगीत दिले होते. ती गाणी आजही रसिकांना आठवतात. त्यात नदीम श्रवन या जोडीचे अनेक गाणी सगळ्यात सरस ठरेल. अश्या ‘दो हंसो का जोडा आज बिछड गया. ‘ प्रमाणे फारच दुखद अशी बातमी आली आहे.
सदर बातमी ऐकताच त्यांच्या चाहत्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. श्रावण राठोड हे एकेकाळी नदीम सैफीबरोबर गाणी बनवत असत. या जोडीवर संगीत रसिकांनी आणि चित्रपट प्रेक्षकांनी खूप प्रेम केले होते. कारण या दोघांनीही संगीताच्या जगात सर्वोत्कृष्ट कामगिरी केली होती. ‘आशिकी’ सारख्या सिनेमात ध्वनि संगीत देत होती. त्यानंतर २००५ मध्ये दोस्ती चित्रपटाच्या संगीतानंतर ही जोडी प्रसिध्द झाली होती.
यापूर्वी या जोडीने पहिल्यांदाच १९७९ मध्ये भोजपुरी चित्रपट ‘दंगल’ मध्ये संगीत दिले होते. पण नदीम-श्रावण यांना खरी ओळख ‘आशिकी’ चित्रपटापासून मिळाली. या चित्रपटाची गाणी सुपरहिट झाली. त्यांची जोडी गुलशन कुमारची टी सिरीजची आवडती जोडी होती.