पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ए आर रहमान हे देशातील प्रसिद्ध संगीतकारांपैकी एक आहेत. त्यांनी हिंदी आणि तमिळ भाषेसाठी अनेक गाणी गायली आहेत. त्यांच्या गीतांचे आवाज देशातच नाही तर परदेशातही लोकप्रिय आहेत. यापूर्वी, जेव्हा रहमानने आपल्या पत्नीला स्टेजवर तमिळमध्ये बोलण्यास सांगितले होते, तेव्हापासून तो प्रसिद्धीच्या झोतात आला होता. आता नुकतीच बातमी येत आहे की ए आर रहमानची संगीत मैफल (कॉन्सर्ट) पुणे पोलिसांनी बंद केली आहे.
काल रात्री पुण्यातील राजा बहादूर मिल परिसरात ए आर रहमानचा कॉन्सर्ट सुरू होता. यावेळी हजारोंच्या संख्येने प्रेक्षक त्या मैफिलीचा आनंद लुटत होते. ही मैफल सुरू असतानाच पोलिसांनी येऊन मैफल थांबवली. त्याचे फोटोही व्हायरल होत आहेत. ए आर रहमान गाणे म्हणत असतानाच पोलिसांनी शो थांबविला.
राजा बहादूर मिल परिसरात रात्री १० नंतर मैफलीला परवानगी नव्हती. शोची वेळ रात्री ८ ते रात्री १० वाजेपर्यंत होती. रात्री १० वाजेनंतर शो सुरू राहिला. त्यामुळे पोलिस तेथे पोहोचले आणि त्यांना हस्तक्षेप करावा लागला. यादरम्यान रहमान यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रात्री १० नंतर कॉन्सर्ट का सुरू ठेवला, असा प्रश्न विचारला.
पोलिसांनी हा शो थांबवण्याबाबत ए आर रहमानने अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही. त्याची प्रतिक्रीयाही आलेली नाही. पुण्यातील त्याच्या शोचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यासोबतच त्यांनी प्रेम दिल्याबद्दल पुण्याचे आभार मानले आहेत.
Music Composer A R Rehman Pune Concert Police Action