इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मनोरंजन विश्वात अत्यंत मानाचा पुरस्कार म्हणजे ‘ऑस्कर’ पुरस्कार. दरवर्षी भारतातून यासाठी चित्रपट पाठवले जातात. त्यासाठी काही नामांकित होतातही. पण, पुरस्कारांच्या बाबतीत आपल्याला अपयश येते. यंदा मात्र, भारतीयांसाठी अत्यंत अभिमानास्पद गोष्ट घडली आहे. ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा तर ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला बेस्ट ओरिजिनल गाण्याचा पुरस्कार मिळाला.
‘ऑस्कर’ या मानाच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये यंदा भारताला दोन पुरस्कार मिळाले, आणि भारतीयांची मान अभिमानाने उंचावली. ऑस्कर विजेत्यांवर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच संगीतकार ए.आर. रहमान यांचे एक वक्तव्य समोर आले आहे. रेहमान यांची ही जुनी मुलाखत व्हायरल होत असल्याची चर्चा आहे. त्यात त्यांनी भारतीय चित्रपट ऑस्करमध्ये पाठवण्याबद्दल वक्तव्य केलं आहे
ए. आर. रहमान हे संगीत क्षेत्रातील प्रतिभावान संगीतकार. त्यामुळे त्यांच्या मताचा आदर केला जातो. आताही ऑस्करबाबत त्यांनी आपले विचार ठामपणे मांडले आहेत. अनेक संगीतकार आणि ऑर्केस्ट्राबरोबर म्युझिक तयार करण्याची जुनी पद्धत कशी बदलली, असा प्रश्न प्रसिद्ध भारतीय संगीतकार, गायक ए.आर रहेमान यांना एल सुब्रमण्यम यांनी एका मुलाखतीत विचारला. त्यावर रहमान यांनीदेखील मोकळेपणाने उत्तर दिले. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे हा बदल घडल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याआधी एका चित्रपटासाठी केवळ आठ ट्रॅक होते, पण मी जिंगल बॅकग्राऊंडमधून आलो होतो, त्यामुळे माझ्याकडे १६ ट्रॅक होते आणि मी त्यात बरंच काही करू शकत होतो. त्या काळी ऑर्केस्ट्रा महाग होता. यामुळे मला प्रयोग करायला भरपूर वेळ मिळाला. माझे अपयश कोणालाच माहीत नाही, उलट लोकांनी फक्त माझे यश पाहिले असल्याचे रहमान सांगतात.
In conversation with @Drlsubramaniam ☺️??
— A.R.Rahman (@arrahman) March 15, 2023
पैशांची गरज सर्वांना आहे पण त्यापलीकडे माझ्यात काम करण्याची जिद्द होती. पश्चिमी देश जे करू शकतात, ते आपण का नाही करू शकत, असे मला नेहमीच वाटत आले आहे. जर आपण त्यांचे संगीत ऐकतो, तर ते आपली गाणी का ऐकू शकत नाहीत? एखादे गाणे झाले की मी स्वतःला विचारतो की अजून चांगले प्रॉडक्शन, चांगली गुणवत्ता, चांगले वितरण आणि मास्टरिंग कसं करता येईल आणि या गोष्टी मला अजूनही प्रेरणा देतात”.
यावेळी रहमान यांनी ऑस्करवार भाष्य केलं. ते म्हणाले की, “कधीकधी मी पाहतो की आपले चित्रपट ऑस्करपर्यंत जातात, पण पुरस्कार मिळत नाहीत. ऑस्करसाठी चुकीचे चित्रपट पाठवले जात आहेत, असं मला वाटतं. असं अजिबात करू नये. आपण समोरच्या व्यक्तीच्या दृष्टीकोनातून विचार केला पाहिजे. इथे काय चाललं आहे, हे पाहण्यासाठी मला पाश्चिमात्य देशाप्रमाणे विचार करावा लागेल, असं रहमान यांनी या मुलाखतीत म्हटलं आहे. दरम्यान, ही मुलाखत जानेवारी महिन्यातील असल्याची माहिती समोर आली आहे
PS2 at London #mattydunkley #manirathnam pic.twitter.com/aSMsjPDPNM
— A.R.Rahman (@arrahman) March 20, 2023
Music Composer A R Rahman on Oscar Film Selection