कळवण – सप्तशृंगगडावर सुरक्षारक्षकाचा खून झाल्याची घटनेमुळे खळबळ उडाली आहे. अर्जुन पवार (३०) असे या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. गडावरील गणेश घाटाच्या धबधब्यापुढे रात्री ९ वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह आढळून आला. पोलिसांच्या प्राथमिक तपासात हा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. नांदुरी ते सप्तशृंगगड या दहा किलोमीटरच्या अंतरात गणेश घाटाच्या धबधब्याजवळ हा सुरक्षारक्षक जखमी असल्याचे गडावर दर्शनासाठी येणाऱ्या काही भाविकांनी पाहिले. त्यांनी सप्तशृंगगडावरील न्यासाच्या कार्यालयास ही माहीती दिली. घटनास्थळावर न्यास प्रशासनाने रुग्णवाहिका पाठविली व वरीष्ठ अधिकारी व पोलिसांना या घटनेची माहीती देण्यात आली. पवार हा सप्तशृंग गडावर देवी संस्थान मध्ये सुरक्षारक्षक या पदावर कार्यरत होता. याप्रकरणी कळवण पोलिसांनी अज्ञात विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास कळवण पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक समाधान नागरे करीत आहे.