अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
गोळीबारात अफगाणिस्तान येथील मुस्लिम धर्मगुरुची हत्या घडल्याची घटना येवला तालुक्यातील चिचोंडी येथील एमआयडीसी मध्ये घडली आहे. या गोळीबाराच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. यात सूफी ख्वाजा सैय्यद जरीफ चिश्ती असे मृत अफगाणिस्तान येथील या धर्मगुरुचे नाव आहे या धर्मगुरुच्या डोक्याला गोळी लागली. यावेळी सोबत असलेल्या साथीदारांनी अज्ञात वाहनातून पळ काढला.
या घटनेची माहिती मिळताच येवला शहर पोलिसांना देताच येवला शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान माथुरे व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सूफी ख्वाजा सैय्यद जरीफ चिश्ती यांना येवला येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. गोळीबाराचे कारण अद्याप अस्पष्ट जरी असेल मात्र हा गोळीबार धार्मिक कार्यातून घडला असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी येवला शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी नुसार उशिरा रात्री गुन्हा दाखल झाला असून तिघांविरुद्ध गून्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील तिघे फरार आरोपींचा पोलीस कसून शोध घेत आहे.
Nashik Yeola Murder Gun Shoot Afghanistan Sufi Cleric Crime Nashik Rural