नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांचे इंस्टाग्राम अकाऊंट हॅककरुन त्यावर पैसे मागण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या हॅकप्रकरणी डॅा. नागरगोजे यांनी सायबर पोलिसांकडे तक्रारी केली आहे. डॅा. नागरगोजे यांना इंस्टाग्राम अकाऊंट हॅक करून त्यावरून फ्रेंड लिस्ट मधील व्यक्तींकडून पैसे मागण्याचा प्रकार लक्षात आला. त्यानंतर त्यांनी हे अकाऊंट बंद करुन त्यांनी नागरिकांनी कोणत्याही प्रकारे पैसे देऊ नये असे आवाहन केले आहे. गेल्या महिन्यातच नाशिक विभाग आयुक्त राधाकृष्ण गमे व नाशिक महापालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पूलकुंडवार यांच्या नावाने व्हॅाटसअॅपव्दारे पैसे मागण्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर आता महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांचे इंस्टाग्राम अकाऊंटच हॅककरुन त्यावर पैसे मागण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.