ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या जगभरात ‘ ईआय ‘ म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजंट अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता या संदर्भात चर्चा सुरू आहे. याचे बरे वाईट परिणाम जगात आगामी काळात होणार असून त्यामुळे त्या संदर्भात उलट सुलट चर्चा सुरू आहे. मात्र याचा काही ठिकाणी गैरवापर देखील सुरू झाला आहे. भारतात याचा प्राथमिक स्तरावर वापर सुरू असतानाच आता त्याचा गैरवापर करून करून लहान मुलींचे बनावट अश्लील छायाचित्रे तयार करणाऱ्या दोघा विकृत तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे हे दोघे तरुण पोलीस कर्मचाऱ्यांची मुले असून त्यांना या प्रकरणी जाब विचारण्यासाठी गेलेल्या दोघा तरुणींना देखील या दोन गुंड मुलांनी मारहाण केली त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
केला हा उद्योग
‘माणसापेक्षा कृत्रिम बुद्धिमत्ता ही अधिक ताकदवान ठरली, तर माणसाचे व संपूर्ण मानवतेचे असणं पूर्णपणे कालबाह्य ठरण्याचा धोका बळावतो. ‘हे नवे सुपरइंटेलिजन्स पृथ्वीवर माणसापेक्षाही अधिक प्रभावी ठरत असल्याचे आपल्याला दिसून येईल. मात्र त्याच्या होणाऱ्या परिणामांवर आताच विचार करणं, किंवा त्याबाबत अंदाज वर्तविणेदेखील अवघड आहे. मात्र या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून दोन तरुणांनी अश्लील छायाचित्रे तयार करून ती सोशल मीडियावर अपलोड केल्याने मोठी खळबळ उडाली आहे
इन्स्टाग्रामचा वापर
नालासोपारा पश्चिमेच्या कळंब गावात रहाणाऱ्या जीत निजाई (१९) याने अनेक मुलींची अश्लिल छायाचित्रे तयार करून त्याआधारे बनावट ‘इन्स्टाग्राम’ खाती त्याने तयार केली होती. या छायाचित्रांच्या आधारे इन्स्टाग्रामवर बनवाट खाती उघडून मुलींची बदनामी केली. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या दोन तरूणींना रात्री जीत आणि भाऊ यश (२२) यांनी मारहाण केली. तक्रारीनंतर पोलिसांनी रात्री उशीरा दोघांना अटक केली. त्यांच्या चौकशीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून दोघांनी तरुणींची अश्लिल छायाचित्रे तयार केल्याचे उघड झाले. कृत्रिम बुद्धिमत्ते’चा वापर झालेला राज्यातील पहिला गुन्हा विरारच्या अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला. या प्रकरणी जीत आणि त्याचा भाऊ यश यांच्यावर विनयभंग, माहिती तंत्रज्ञान कायदा, बालकांवरील लैंगिक अत्याचार विरोधी कायदा (पोक्सो) आदी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक कल्याणराव करपे यांनी सांगितले.
Mumbai Virar Crime Artificial Intelligence Youth Arrested
Girl Obscene Picture Photos AI Instagram Police FIR Case
First Case