मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ज्येष्ठ मराठी अभिनेत्री सीमा रमेश देव (वय ८१) यांचे आज येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पुत्र तथा अभिनेता अजिंक्य, सून, नातवंडे असा परिवार आहे. गेल्या तीन वर्षापासून त्या दुर्धर आजाराला तोंड देत होत्या. राहत्या घरीच त्यांचे आज सकाळी निधन झाले.
गेल्या तीन वर्षांपासून त्यांना अल्झायमर या आजाराने ग्रासले होते. त्याच्याशी त्या झुंज देत होत्या. पण, ती अपयशी ठरली. आज सकाळी वांद्रे येथील त्यांच्या राहत्या घरी सकाळी ७ वाजेच्या सुमारास त्यांचे निधन झाले. सीमा देव यांच्या पार्थिवावर आज दुपारी ५ वाजेच्या सुमारास शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
ज्येष्ठ दिवंगत अभिनेते रमेश देव यांच्या सीमा या पत्नी होत्या. रमेश देव यांचे २२ फेब्रुवारी २०२२ रोजी निधन झाले. सीमा देव यांनी मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. आनंद, जगाच्या पाठीवर,यंदा कर्तव्य आहे, या सुखांनो या, हा माझा मार्ग एकला अशा विविध चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केली.
सीमा देव यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये भरीव कार्य केले. त्यांनी एकूण ८० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये भूमिका केली. त्यामुळे त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीतून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचे मूळ नाव नलिनी सराफ असे होते. सीमा देव यांनी १९५७मध्ये आलिया भोगासी या चित्रपटातून त्यांच्या कारकीर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी ‘जगाच्या पाठीवर’, ‘मोलकरीण’, ‘यंदा कर्तव्य आहे’, ‘या सुखांनो या’, ‘सुवासिनी’, ‘हा माझा मार्ग एकला’, ‘आनंद’ अशा अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केली. जी सर्वाधिक गाजली. २०१७ मध्ये पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफमधील) सीमा देव यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
Mumbai Veteran Actress Seema Dev Passes Away
Marathi Hindi Film Industry