मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आजच्या काळात मुलींनी अनेक क्षेत्रात पाऊल ठेवून प्रगती केली आहे, असे कोणते क्षेत्र नाही की, त्या क्षेत्रात तरुण मुली नाहीत, प्रत्येक क्षेत्रात त्यांचा वावर दिसून येतो. अलीकडच्या काळात मुलींना पोलीस भरतीचेही आकर्षण वाटत आहेत. यासाठी अनेक मुली तयारी करत असतात. याचाच गैरफायदा घेत एका पोलीस आणि त्याच्या मैत्रिणींनी खासगी पोलीस प्रशिक्षण केंद्र सुरू केले. परंतु तेथे मुलींना पोलीस प्रशिक्षण देण्याऐवजी भलताच गैरप्रकार सुरू होता. तेथे या उमेदवारी करणाऱ्या मुलींचे लैंगिक शोषण करण्यात येत होते. या प्रकरणामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.
दोघांना अटक
नालासोपारा येथे समाधान गावडे (२८) आणि त्याची २५ वर्षीय पोलिस मैत्रीण रेल्वे पोलिस म्हणून कार्यरत विजयी भव नावाची खासगी पोलिस अकादमी चालवत होते, तेथे पोलिस भरती प्रशिक्षणाचे क्लासेस सुरु होते. मात्र खासगी पोलिस प्रशिक्षण क्लास घेत त्याच्या नावाखाली दोन मुलींचे लैंगिक शोषण करण्यात आले होते. याबाबत मुलींनी आपल्या आईवडिलांकडे तक्रार केली होती. याची तत्काळ दखल घेण्यात आली आहे. पोलिसासह त्याच्या मैत्रिणीला पोलिस सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. मुलींचे लैंगिक शोषण प्रकरणातील दोन्ही आरोपी पोलिस सेवेत असताना खासगी पोलिस प्रशिक्षण केंद्रात चालवत होते, या दोन्ही पोलिसांना वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे सहकार्य किंवा पाठींबा असावा, अशीही चर्चा सुरू आहे. मात्र आता दोघांवरही गुन्हा दाखल होऊन अटक झाली असून त्यांना निलंबित करण्यात आले आहे
क्लासची खुलेआम जाहिराती
वास्तविक पाहता शासकीय सेवेत विशेषता पोलीस विभागामध्ये काम करताना किंवा निलंबित असताना उपजीविकेसाठी कोणताही व्यवसाय करू शकत नाहीत, असा नियम आहे. समाधान गावडे आणि त्याची पोलिस मैत्रीण रेल्वे पोलिस म्हणून कार्यरत असताना पोलिस भरती प्रशिक्षणाचे क्लासेस चालवायचे, याचे सर्वांना आश्चर्य वाटत आहे. याबाबत वरिष्ठांना दोघांनी कळविले नव्हते, किंवा कळविले असले तरी वरिष्ठांनी दुर्लक्ष केले असे दिसून येते, वरिष्ठांनी त्यांच्याकडून लेखी खुलासा घेतला होता का ? असे सवाल उपस्थित केले जात आहेत. खासगी पोलिस अकादमी चालवत असताना विशेष म्हणजे त्याने शहरात स्वत:चे गणवेशातील मोठे फोटो टाकून रेल्वेस्थानकाच्या परिसरात बॅनरबाजी केली होती.
His girlfriend was suspended from service along with the police Mumbai Vasai Virar Police Crime Sexual Abuse Suspension