सोमवार, ऑक्टोबर 6, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

मुंबईत भुयारी मेट्रो कधीपर्यंत धावणार? तब्बल १२ मार्गांचे काम वेगाने

ऑगस्ट 27, 2022 | 5:12 am
in राज्य
0
Mumbai Metro

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबईकरांना पर्यायी कनेक्टिव्हिटी प्रदान करण्याच्या उद्देशाने, मुंबई मेट्रो बांधण्याची योजना २००६ मध्ये आकाराला आली आणि मुंबई मेट्रोच्या नकाशानुसार फेज-१ ची पायाभरणी झाली. तथापि, परिचालन आणि धोरणात्मक विलंबामुळे मुंबई प्रकल्पातील मेट्रो मार्गांना विलंब झाला आणि जून २०२१ पर्यंत, फक्त एक मुंबई मेट्रो मार्ग कार्यान्वित झाला आहे. सद्यस्थितीत १२ मार्गांचे काम अतिशय वेगाने सुरू असून येत्या पुढील वर्षी मुंबईची भुयारी मेट्रो धावणार आहे.

मुंबईतील ‘मेट्रो २ए (2A)’ (दहिसर ते डीएन नगर) आणि ‘मेट्रो ७’ (दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व) मेट्रो मार्गांचा पहिला टप्पा २ एप्रिल २०२२ पासून प्रवाशांसाठी कार्यान्वित करण्यात आला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. नवीन मेट्रो मार्ग दररोज ३ लाखांहून अधिक प्रवासी घेऊन जातील अशी अपेक्षा आहे. मेट्रो २ए (2A) चा पहिला टप्पा दहिसर ते डहणीकरवाडी आणि मेट्रो ७ चा पहिला टप्पा दहिसर ते आरे कॉलनी असा आहे.

मुंबईतील धावपळीचे जीवन, लोकलगाड्यांना होणारी गर्दी, भरभरून वाहणाऱ्या बस, गर्दीने फुलणाऱ्या चौपाट्या इत्यादींबाबत कुतूहल मिश्रित आकर्षण सगळ्यांनाच असते. त्यामुळेच सर्व जण मुंबईकडे धाव घेत असतात. ही मायानगरीही सगळ्यांना आपुलकीने सामावून घेते. अशा या महानगरात आता मेट्रोचे जाळे विस्तारू लागले आहे. मुंबई महानगर प्रदेशातील वाढत्या लोकसंख्येला जलद मेट्रो सेवा देण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत विविध मार्गांवर मेट्रो प्रकल्प हाती घेतले असून, यातील बहुतांश प्रकल्पांचे काम प्रगतिपथावर आहे.

सध्या सुमारे १ कोटी १० लाख नागरिक सार्वजनिक वाहनांनी प्रवास करतात. त्यापैकी ५२ टक्के लोकलने, तर २६ टक्के बसने प्रवास करतात. या प्रवाशांचा प्रवास जलद व्हावा, वेळ वाचावा या दृष्टीने २०२६ पर्यंत मुंबईतील मेट्रो मार्गांचे काम पूर्ण करण्याचे प्रस्तावित आहे. मुंबई महानगर प्रदेश परिसरात त्यामुळे वर्तुळाकार मेट्रो मार्ग तयार होतील. साधारणत: २०३१ पर्यंत १ कोटी प्रवासी मेट्रोने प्रवास करतील, असा दावा करण्यात आला आहे.

 वेस्टर्न लाइन
मेट्रो १ या घाटकोपर – अंधेरी – वर्सोवा मार्गामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरे जोडली गेली आहेत. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचला असून, प्रवास वेगवान झाला आहे. पश्चिम उपनगरात मेट्रो – २ या दहिसर पूर्व ते डीएन नगर आणि मेट्रो – ७ या दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व या दोन प्रकल्पांतील पहिल्या टप्प्यातदेखील मेट्रो धावू लागल्याने वेस्टर्न लाइन सुपर फास्ट झाली आहे. आता कुलाबा- वांद्रे – सीप्झ या भुयारी मेट्रो – ३ कडे आरेमधील कारशेडच्या मुद्द्यावरून सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. डिसेंबर, २०२३ पर्यंत बीकेसी ते सीप्झ या पहिल्या टप्प्यात भुयारी मेट्रो धावू लागेल, असा दावाही करण्यात आला आहे.

भुयारी मेट्रोची वैशिष्ट्ये :
मुंबई मेट्रो मार्ग – ३ ची एकूण लांबी ३३.५ किमी असून हा मार्ग संपूर्ण भुयारी आहे. मार्गात २६ भुयारी आणि एक जमिनीवरील अशी २७ स्थानके आहेत.२०३१ पर्यंत १७ लाख प्रवासी प्रतिदिन प्रवास करतील. मार्गिका सुरू झाल्यानंतर नरिमन पॉइंट, वरळी, वांद्रे कुर्ला संकुल व आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत प्रवासाचे विमानतळ, मरोळ औद्योगिक वसाहत, सीप्झ अशी महत्त्वाची केंद्र मेट्रोने जोडली जातील.

दहिसर (पूर्व) आणि मीरा-भाईंदर दरम्यान धावणाऱ्या मेट्रो – ९ चे काम वेगाने सुरू असून, येथून दररोज ८ लाख प्रवासी प्रवास करतील. वडाळा – कासारवडवली या मेट्रो मार्ग ४ चे काम वेगाने सुरू असून, भांडुप आणि मुलुंड परिसरातील काम प्रगतिपथावर असल्याचा दावा प्राधिकरणाने केला आहे. पिअर कास्टिंग, पायलिंग, लोखंडी सळ्या बांधणे, पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या वळवण्याचे व यू गर्डर लाँचिंगचे काम प्रगतिपथावर असून, प्रकल्पाची एकूण प्रगती ३८ टक्के झाली आहे.

एमएमआरडीएच्या म्हणण्यानुसार, या सर्व मेट्रो मार्गांचे सिव्हिल काम सुरू झाले आहे आणि ते २०२३ ते २४ पर्यंत तयार होण्याची अपेक्षा आहे. यात
वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर
दहिसर-चारकोप-अंधेरी
कुलाबा-वांद्रे-सीपझेड
वडाळा-मुलुंड-कासारवडवली
कासारवडवली-गायमुख
ठाणे-भिवंडी-कल्याण
लोखंडवाला-जोगेश्वरी-कांजूरमार्ग
दहिसर पूर्व-वांद्रे पूर्व
अंधेरी-मुंबई विमानतळ
मुंबई विमानतळ- नवी मुंबई विमानतळ
दहिसर पूर्व- मीरा भाईंदर
गायमुख-शिवाजी चौक
वडाळा-सीएसएमटी
कल्याण-डोंबिवली-तळोजा
मीरा भाईंदर-विरार
कांजूरमार्ग-बदलापूर या मार्गाचा समावेश आहे

Mumbai Underground Metro Development Infrastructure

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अवघ्या ९ वर्षांच्या चिमुरडीला आला हृदयविकाराचा झटका; बायपास शस्त्रक्रीया झाली यशस्वी

Next Post

पंढरपूरला साकारते आहे अनोखे नामसंकीर्तन सभागृह; असे आहे त्याचे वैशिष्ट्य

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

IMG 20251005 222224
संमिश्र वार्ता

कोजागिरी पौर्णिमेला रात्री मसाला दूध, बासुंदी किंवा खीर का पितात?

ऑक्टोबर 5, 2025
jail11
क्राईम डायरी

सहा तडिपारांचे शहरात वास्तव्य….पोलीसांनी ठोकल्या बेड्या

ऑक्टोबर 5, 2025
IMG 20251004 WA0392 1
स्थानिक बातम्या

चांदवडच्या पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सवाच्या अनुषंगाने असलेली कामे प्राधान्याने पूर्ण करावीत….मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ऑक्टोबर 5, 2025
IMG 20251004 WA0374
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक – त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठक….मुख्यमंत्र्यांनी दिले हे निर्देश

ऑक्टोबर 5, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी खर्चाची तयारी ठेवावी, जाणून घ्या, रविवार, ५ ऑक्टोंबरचे राशिभविष्य

ऑक्टोबर 5, 2025
FB IMG 1759682974066
संमिश्र वार्ता

आज आहे कोजागिरी पौर्णिमा; असे आहे त्याचे महत्त्व

ऑक्टोबर 5, 2025
G2Z45ldXEAAahvP 1024x843 1
मुख्य बातमी

सरकारी भरतीबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

ऑक्टोबर 4, 2025
WhatsApp Image 2025 10 04 at 7.59.57 PM
संमिश्र वार्ता

अनुकंपा नोकरीमुळे जगण्याला मिळालं बळ!

ऑक्टोबर 4, 2025
Next Post
1 639 1140x570 1 e1661516421565

पंढरपूरला साकारते आहे अनोखे नामसंकीर्तन सभागृह; असे आहे त्याचे वैशिष्ट्य

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011