मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पर्यटकांच्या सोयी सुविधेसाठी राज्य आणि केंद्र शासनाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत, त्याचाच एक भाग म्हणून उद्यापासून म्हणजेच दि. १ नोव्हेंबर पासून मुंबई क्रूझ टर्मिनल ते मांडवा अशी वॉटर टॅक्सी सुरू होत आहे. या मार्गावर वॉटर टॅक्सी सुरू झाल्याने मुंबई ते मांडवा हा प्रवास केवळ ४५ मिनिटांत पूर्ण करणे शक्य होणार आहे. दरम्यान, वॉटर टॅक्सीने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना ४०० रुपये भाडे असणार आहे.
या संदर्भात एका कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, वॉटर टॅक्सीमधील प्रवाशांची सोय लक्षात घेऊन ही वॉटर टॅक्सी तयार करण्यात आली आहे. यातून सुमारे २०० प्रवासी एकाच वेळी प्रवास करू शकतील. तसंच या टॅक्सीमध्ये एसीचीही सुविधा आहे. विशेष म्हणजे जलमार्गाने प्रवाशांना वाहतुकीचा दुसरा पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेब्रुवारी २०२२ मध्ये वॉटर टॅक्सी सेवा सुरू केली होती.
क्रूझ टर्मिनलच्या प्रवाशांसाठी उत्तम कनेक्टिव्हिटी सुविधा नसल्यामुळे वॉटर टॅक्सी कंपन्यांनी मुंबईतून सेवा सुरू करण्यास नकार दिला होता. सध्या बेलापूर ते जेएनपीटी, एलिफंटादरम्यान ही सेवा सुरू आहे. मुंबई क्रूझ टर्मिनलवरून सेवा सुरू करण्यास परवानगी मिळाल्यानंतर सुमारे सहा महिन्यांनंतर नयनतारा शिपिंग कंपनीने मुंबई ते मांडवा दरम्यान वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे.
सदर वॉटर टॅक्सी सेवाही गेटवे ऑफ इंडियावरूनही वॉटर टॅक्सी सेवा उपलब्ध होईल. यापुर्वी मांडवा दरम्यानच्या क्रुझ टर्मिनलवरून सुरू करण्याची परवानगी देण्यात आली होती. आता गेट वे ऑफ इंडिया येथून वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून परवानगी मिळणार आहे. त्यानंतर बेलापूर ते एलिफंटासाठी गेटवे ऑफ इंडिया इथून वॉटर टॅक्सी सेवा उपलब्ध होईल. या वॉटर टॅक्सीसाठीचं बुकिंग सुरू झाले असून प्रवाशांना ऑनलाइन तिकीट बुक करता येऊ शकते. प्रारंभी ही टॅक्सी सेवा सकाळी १०.३०पासून मुंबई क्रूझ टर्मिनलवरुन उपलब्ध होईल. प्रवाशांच्या प्रतिसादानुसार या वेळेत बदल केला जाऊ शकतो. गेट वे ऑफ इंडियावरुन टॅक्सी सेवा सुरू झाल्यानंतर सकाळी ८.३० ते संध्याकाळी ६.३० पर्यंत ही सेवा सुरू राहील. क्रूझ टर्मिनलच्या प्रवाशांसाठी उत्तम कनेक्टिव्हिटी सुविधा नसल्यामुळे वॉटर टॅक्सी कंपन्यांनी मुंबईतून सेवा सुरू करण्यास नकार दिला होता. आता वॉटर टॅक्सीमधील प्रवाशांची सोय लक्षात घेऊन ही वॉटर टॅक्सी तयार करण्यात आली आहे. दरम्यान, सुरुवातीच्या काळात टॅक्सी सेवा जलमार्गाने प्रवाशांना वाहतुकीचा दुसरा पर्याय उपलब्ध नव्हता.
लवकरच गेटवे ऑफ इंडिया इथून आणखी वॉटर टॅक्सी सेवा उपलब्ध होईल. सध्या जलमार्गाने प्रवास करण्यासाठी हा एक चांगला पर्याय म्हणून याकडे पाहिले जात आहे. सध्या मुंबईहून अलिबागला जाण्यासाठी भाऊचा धक्का येथून रो रो सेवा सुरू आहे. रो रोने अलिबागला पोहचण्यासाठी ६० ते ७० मिनिटे लागतात. मात्र हा प्रवास आणखी जलद गतीने पार करण्यासाठी वॉटर टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय सागरी मंडळाने घेतला असल्याची माहिती सागरी मंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.
Mumbai to Mandwa Water Taxi Service Will Start from Tomorrow