ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसांमध्ये ठाणे शहरात अनेक वेगवेगळ्या घटना घडत आहेत. यामध्ये चोऱ्या – हाणामारी, गुन्हेगारी, कौटुंबिक कलह अशा प्रकारचे गुन्हे मोठ्या प्रमाणावर दिसून येतात, त्यातच आता आणखी एक धक्कादायक व भयानक घटना समोर आली आहे. ठाण्याचे माजी महापौर गणेश साळवी यांचे मोठे बंधू व कळव्यातील बांधकाम व्यावसायिक दिलीप साळवी (५७) यांनी चारित्र्याच्या संशयावरून पत्नी प्रमिला साळवी (५२) हिच्यावर गोळी झाडून तिची हत्या केल्याची घटना घडली. आणखी भयानक म्हणजे या गोळीबारा नंतर काही अंतराने दिलीप यांचाही मेंदूतील रक्तस्रावाने मृत्यू झाला.
अनेक दिवसांपासून वाद
ठाणे शहरातील कळवा परिसरातूनही भयानक घटना समोर आली आहे. बांधकाम व्यावसायिक दिलीप साळवी आणि त्यांच्या पत्नीमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होते. त्यात पत्नीच्या चारित्र्यावरही ते संशय घेत होते. दिलीप पत्नीच्या चारित्र्यावरही संशय घेत होते, अशी माहिती दिलीप यांचा मुलगा प्रसाद (२५) याने पोलिसांना दिली. त्यातून दिलीप साळवी यांनी पत्नी प्रमिला साळवी हिच्यावर गोळी झाडून तिची हत्या केली. दिलीप हे नेहमीच चिडायचे, आरडाओरडाही करायचे. त्यांना दारूचेही व्यसन होते, अशी माहिती पाेलिसांच्या चाैकशीत पुढे आली आहे.गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच ठाण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त महेश पाटील, उपायुक्त गणेश गावडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैया थोरात आदींनी धाव घेतली. पोलिसांनी दोघांचेही मृतदेह ताब्यात घेतले. शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात पाठवले आहे.बांधकाम व्यावसायिक दिलीप साळवी हे ठाण्याचे माजी महापौर गणेश साळवी यांचे मोठे बंधू असल्याची माहिती आहेत.
परिसरात खळबळ
रात्रीच्या वेळी बंदुक तथा पिस्तुलाच्या गोळ्यांचा आवाज आल्याने कळव्यामधील मनीषानगरात कुंभारआळीतील साळवी यांच्या घरात भयानक घडले, अशी चर्चा सुरू झाली होती. हत्या व आत्महत्येचे नेमके कारण अजून समजू शकले नाही. दिलीप साळवी आणि त्यांच्या पत्नी प्रमिला यांच्यात काही कारणावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, त्यांनी परवानाधारक रिव्हाल्वर मधून सरळ आपल्या पत्नीवर गोळ्या झाडल्या.घरातील हॉलमध्ये त्यांच्या या आवाजाने परिसरातील रहिवासी जमले होते. त्यांनी याची माहिती त्यांनी कळवा पोलिसांना दिली.
पत्नीपाठोपाठ पतीही
हत्येनंतर त्यांनी स्वत:वर गोळी झाडत आपली जीवनयात्रा संपवली असे वाटले कारण घरात पती-पत्नी दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडल्याने दिलीप यांनीही स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली असावी, असे चित्र सुरुवातीला पोलिसांनाही दिसले. मात्र, तपासणीमध्ये त्यांच्यावर गोळीबार किवा कुठेही जखमा नसल्याचे दिसत असून मेंदूतील रक्तस्त्रावाने त्यांचा मृत्यू झाला असे कळवा पोलिसांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी पंचनामा केला आहे. दिलीप आणि प्रमिला दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
Mumbai Thane Crime Husband Murder Wife Death