मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उबाठा) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री या बंगल्यामध्ये विषारी कोब्रा आढळून आला. पार्किंगमध्ये कोब्रा आढळताच बंगल्याच्या कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. त्यांनी तातडीने सर्पमित्रांशी संपर्क साधला.
रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास मातोश्री बंगल्यामध्ये पार्किंगच्या ठिकाणी कोब्रा हा विषारी साप आढळून आला. कर्मचाऱ्यांना ही बाब कळताच त्यांनी तातडीने वाईल्ड लाईफ ॲनिमल प्रोटेशन ॲन्ड रेस्क्यू असोशिएशनशी संपर्क साधला. तत्काळ सर्पमित्रांना पाठविण्याची विनंती करण्यात आली. त्यानंतर सर्पमित्र अतुल कांबळे हे मातोश्री या बंगल्याच्या ठिकाणी आले. त्यांनी शिताफीने कोब्रा या सापाला पकडले. जवळपास ४ फूट असलेला हा कोब्रा अतिशय विषारी जातीचा आहे. ठाणे वनविभागालाही यासंदर्भात माहिती देण्यात आली. वनविभागाच्या सूचनांनुसार, या कोब्राला जंगलात सोडण्यात आले.
mumbai thackeray bungalow matoshri king cobra sneck
UBT Uddhav Aditya Balasaheb Kalanagar Forest Wild Animal