मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुलांबरोबर मुली देखील विविध खेळात चांगले प्राविण्य मिळवत आहेत. क्रिकेट सारख्या खेळात मुली प्रशिक्षण घेत आहेत. मुंबई शहरात अनेक विद्यार्थिनी क्रिकेटचे प्रशिक्षण घेत असताना एक भयानक घटना घडली, पूर्व उपनगरातील एका इंटरनॅशनल शाळेतील क्रिकेट प्रशिक्षकाने विद्यार्थिनीशी अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
अशी देत होता धमकी
क्रिकेट प्रशिक्षणातून काढून टाकण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीबरोबर अश्लील चाळे करणाऱ्या शाळेतील क्रिकेट प्रशिक्षकाला देवनार पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरोधात विनयभंग व बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदयांतर्गत (पोक्सो) आता देवनार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार घडल्यानंतर बिचारी ती मुलगी खूपच घाबरली होती त्यामुळे तिला काय करावे हे कळत नव्हते, कारण पीडित मुलीने हा प्रकार कुटुंबियांना सांगितल्यानंतर पोलिसांकडे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींनी इतर मुलींबाबतही असे प्रकार केले होते का, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत मात्र या प्रकारामुळे मुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मैदानाशेजारील खोलीत
मूळच्या छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असलेल्या या ३३ वर्षीय क्रिकेट प्रशिक्षकाला देवनार पोलिसांनी अटक केली. आरोपीने शाळेच्या मैदानाशेजारील खोलीत पीडित मुलीसोबत अश्लील चाळे केले. पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार, देवनार पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.प्रथम रायगड पोलिसांकडे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण गुन्हा देवनार पोलिसांच्या हद्दीत घडल्यामुळे पोलिसांनी तो देवनार पोलिसांकडे वर्ग केला. आता देवनार पोलीस या प्रकरणी काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे मात्र यामुळे शाळेची बदनामी होऊ नये यासाठी काळजी घेतली जात आहे.
Mumbai Sports Coach Sexual Abuse Student International School