मुंबई – लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेला श्री सिद्धीविनायक गणपती अंगारक चतुर्थीच्या दिवशीच भक्तांना पावला आहे.गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेले येथील श्री सिद्धीविनायकाचे मंदिर आजच उघडले आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे हे मंदिर बंद होते. राज्य सरकारने गेल्या महिन्यात राज्यभरातील धार्मिक स्थळे खुली केली. मात्र, सिद्धीविनायक मंदिर उघडण्यात आले नाही. आज अंगारक चतुर्थीच्या मुहूर्तावर भक्तांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी बाप्पाच्या दर्शनासाठी आहे. आपणही घरबसल्या घेऊ शकता बाप्पाचे लाईव्ह दर्शन. त्यासाठी खालील व्हिडिओ पहा
https://www.youtube.com/watch?v=ykziLFIbSos