मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एकदा सत्ता हाती आली की सत्ता भोगणाऱ्यांपेक्षा त्यांच्या कुटुंबियांमध्ये आणि नातेवाईकांमध्ये त्याचा गैरफायदा घेण्याची लालसा बरेचदा जास्त प्रमाणात निर्माण होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदाराच्या मुलाने असा काही प्रकार केला की सत्तेचा माज काय असतो याचीच प्रचिती महाराष्ट्राला आली. आता गुन्हा दाखल होताच हा आमदार पुत्र फरार झाला आहे. या प्रकरणावरुन राज्यातील राजकीय वातावरणही तापले आहे. यामुळे विरोधकांना आयते कोलित मिळाले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलाने म्हणजे राज सुर्वे याने अक्षरशः एकाचे अपहरण केल्याची घटना पुढे आली आहे. दोन वेगळ्या लोकांच्या भांडणात पडून तोडी करण्याच्या नादात राज सुर्वे यांनी गुंडागर्दी केली आणि त्यातूनच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्लोबल म्युझिक जंक्शन कंपनीचे प्रमुख राजकुमार सिंग यांनी काही वर्षांपूर्वी मनोज मिश्रा नावाच्या व्यक्तिचे युट्यूब चॅनल आपल्याकडे गहाण ठेवून घेतले होते.
अर्थात मनोज मिश्रा याला पैशांची आवश्यकता होती त्यामुळे सिंग यांनी त्याला आठ कोटी रुपये दिले. पाच वर्षांत त्याचे ११ कोटी परत करण्याचे ठरले. पण मिश्रा याने पैसे वेगळ्याच ठिकाणी गुंतवले आणि आता करार रद्द करण्यासाठी तो सिंग यांच्या मागे लागला. गेल्या वर्षभरापासून तो करार रद्द करून घेण्याच्या मागे लागला आहे. अखेर दोन दिवसांपूर्वी सिंग यांच्या कार्यालयात एक फोन आला आणि प्रकाश सुर्वे यांच्या कार्यालयात येण्यास सांगितले. सिंग यांनी शनिवारी येतो असे सांगून फोन कट केला. मात्र थोड्याच वेळात तिथे दहा-बारा गुंड आले आणि त्यांनी सिंग यांना गाडीत टाकून थेट प्रकाश सुर्वे यांच्या कार्यालयात नेले. त्यानंतर हा प्रकार पोलिसांना कळल्यावर सारा प्रकार नियंत्रणात आला.
धमकी नंतर तक्रार
राजकुमार सिंग याचे अपहरण करून त्याला प्रकाश सुर्वेच्या कार्यालयात आणले. तेव्हा तिथे राज सुर्वे आणि मनोज मिश्रा बसले होते. मनोज मिश्रासोबतचे मॅटर संपव, नाहीतर इथेच बसवून ठेवेन, अशी धमकी राज यांनी दिली. त्यानंतर पोलिसांचे फोन सुरू झाल्यावर साऱ्यांची पळापळ झाली आणि रात्री उशिरा सिंग यांनी सर्वांविरुद्ध तक्रार नोंदवली. राज सुर्वे यांच्यासह पंधरा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलिस सध्या राज सुर्वेचा शोध घेत आहेत. तो सध्या फरार आहे. तर, त्याचे अन्य साथीदार यांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.
A case has been registered against the son of the ruling MLA Mumbai Shinde Group MLA Son Fly Away Surve Crime Extortion Raj Prakash Case Filed Police Custody