ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – समाजात दररोज अनेक गुन्हेगारीच्या घटना घडतात. परंतु एखादी घटना ही सर्व समाजात प्रचंड चर्चेचा विषय ठरते. किंबहुना सर्व समाजमन हेलावून किंवा ढवळून सोडते. सुमारे सहा महिन्यांपूर्वी मुंबईतील एका घटनेने अशीच खळबळ उडून दिली होती. ही घटना म्हणजे विकृत आरोपी मनोज साने याने आपली प्रेयसी सरस्वती वैद्य हिचा खून करून तिच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे करून कुकरमध्ये शिजवले होते. आता या प्रकरणी पोलीस तपास सुरू असून पुढील कार्यवाही कारवाई करण्यात येत आहे. पोलिसांनी ठाणे सत्र न्यायालयात १२०० पानांचे दोषारोपत्र सादर केले आहे. आरोपी मनोज साने याने विष पाजून त्याची ‘लिव्ह इन पार्टनर’ सरस्वती वैद्यची हत्या केली होती. त्यानंतर करवतीने तिच्या मृतदेहाचे असंख्य तुकडे करून कुकरमध्ये शिजवले होते. पोलिसांनी याप्रकरणी एकूण ६२ साक्षीदार तपासले आहेत.
असे आले उघडकीस
दिल्लीतील एका हत्याकांड प्रकरणानंतर मुंबई त अशाच प्रकारे एक हत्या कांड घडले होते या प्रकरणाने संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. हे प्रकरण म्हणजे सरस्वती वैद्य या महिलेचा तिच्या प्रियकराने केलेला निर्दयी पद्धतीने खून होय. मीरा रोड मनोज साने (५६) हा सरस्वती साने (३२) हिच्या सोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये रहात होता. ३ जूनच्या रोजी त्याने सरस्वतीची हत्या करून करवतीने तिच्या मृतदेहाचे असंख्य तुकडे केले होते. हाडे आणि मांस वेगळे करण्यासाठी तो कुकरमध्ये शिजवत होता. पोलिसांना घरात असंख्य तुकडे सापडले. ते कुकर, ३ पातेले आणि २ बादल्या भरून होते. शेजाऱ्यांनी दुर्गंधी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर या प्रकरण याचा तपास करणारे पोलीसही आश्चर्यचकित झाले होते.
वैद्यकीय पुराव्यांचे आव्हान
शेजाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी मनोज साने याला अटक केली होती. पोलिसांनी घटनास्थळावरूनच पुरावे सापडले असले तरी आरोप सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेल्या अनेक वैद्यकीय तसेच न्यायवैद्यक चाचण्या कराव्या लागल्या होत्या. मनोज साने पोलिसांची दिशाभूल करत होता. मृतदेहाचे असंख्य तुकडे करून शिजविल्याने वैद्यकीय पुरावे मिळवणे पोलिसांना आव्हानात्मक बनले होते. अखेर पोलिसांनी तपास पूर्ण करून दोषारोपपत्र (चार्जशिट) न्यायालयात सादर केले आहे. दरम्यान या प्रकरणी नया नगर पोलिसांनी तब्बल १२०० पानांचे दोषारोपत्र तयार करून ठाणे सत्र न्यायालयात सादर केले आहे. त्यामध्ये एकूण ६८ जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहे. त्यात विष, कटर, प्लास्टिक ज्या दुकानातून घेतले त्या दुकानदारांचे जबाब आहेत. शेजाऱ्यांपासून न्यायवैद्यक कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत.
ताकामधून विष
आरोपी मनोज साने याचे हत्येपूर्वी ६ महिन्यांपासून सरस्वती वैद्य बरोबर वाद सुरू होते. त्यामुळे त्याने सरस्वतीला मारण्याची योजना आखली होती. कोणाच्याही डोक्यात येणार नाही अशी कल्पना त्याने अमलात आणली आणि ताकामधून विष दिले होते. नंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून विल्हेवाट लावली, असे या दोषारोपत्रात म्हटले आहे. हत्या केल्यानंतर साने याने मृतदेहासोबत ३५ छायाचित्रे काढली होती. त्याला मोबाईल न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवून पोलिसांनी ती छायाचित्रे पुन्हा मिळवली आहेत. त्यामुळे पोलिसांना तपास करणे नंतर थोडे सोपे झाले होते.
Mumbai Saraswati Vaidya Murder Case Police Charge sheet
Filed Manoj Sane Vasai Virar Meera Road Crime Court Investigation