मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रत्येकच पावसाळ्यात मुंबाईची तुंबापुरी होते. पावसाळ्यात रस्त्यावर तुंबणारे पाणी ही मुंबईकरांच्या दृष्टीने सर्वात गहण समस्या ठरली आहे. या समस्येवर उपाय म्हणून पाणी शोषून घेणाऱ्या ‘पोरस’ काँक्रीटचे रस्ते तयार करण्यात येणार आहेत. या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने तयार होणारे काँक्रीटचे रस्ते पावणाचे पाणी शोषूण घेतील. यामुळे अतिवृष्टीत मुंबईच्या रस्त्यांवर तुंबणाऱ्या पाण्यापासून मुंबईकरांची सुटका होणार आहे.
मुंबईत महापालिकेचे सुमारे २ हजार किमीचे रस्ते आहेत. सर्वच रस्ते सिमेंट काँक्रीटचे बनवण्याचे धोरण पालिकेने स्वीकारले आहे. यामधील सुमारे १ हजार किमी रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण पूर्णही झाले आहे. शिल्लक रस्ते टप्प्याटप्प्याने सिमेंट काँक्रीटचे बनवण्यात येत आहेत. यामध्ये ३९७ किमी रस्त्यांसाठी पालिकेने निविदा मागवल्या आहेत. हे काम ४ महिन्यांचा पावसाळ्याचा कालावधी सोडून वेळेत पूर्ण करून घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग बांधण्याचा अनुभव असलेल्या, तसेच दर्जेदार रस्ता बांधणाऱ्या कंत्राटदाराकडून निविदा मागवण्यात आल्या आहेत.
काय आहे पोरस तंत्रज्ञान?
पोरस तंत्रज्ञानामध्ये वापरले जाणारे काँक्रीट पाणी शोषून निचरा करणारे असेल. या काँक्रीटमधील छिद्रांमधून पाण्याचा निचरा वेगाने होईल. फुटपाथमध्येही हे तंत्रज्ञान वापरता येईल. हे पाणी रस्त्याच्या कडेला असलेल्या छोट्या वाहिन्यांमधून ‘यू’ आकाराच्या गटारामधून जलवाहिन्या, ठराविक अंतरावरील छोट्या विहिरींमध्ये निचऱ्यासाठी पाठवता येईल. जेणेकरून अतिवृष्टी सुरू असताना रस्त्यावर पाणी तुंबणार नाही.
एकाचवेळी दोन समस्यांतून मुक्ती
पावसाळ्यात पाणी तुंबण्यासोबतच डांबर रस्त्यावर पडणारे खड्डे हीसुद्धा मोठी समस्या आहे. त्यावरून दरवर्षीच सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले जाते. मुंबईकरांना रस्त्यावरली खड्ड्यांच्या समस्येपासून मुक्ती देण्यासाठी महापालिकेत्या अखत्यारीतील सर्वच रस्ते काँक्रिटचे केले जाणार आहेत. पोरस तंत्रज्ञावर आधारीत रस्त्यांमुळे खड्ड्यांची समस्या मार्गी लागेलच. शिवाय पावसाच्या पाण्याचा निचराही झपाट्याने होऊ शकणार आहे.
Mumbai Roads Construction Rain Water Absorption Technology
Porous Concrete