मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आपल्या स्वप्नातील नवीन घर खरेदी करण्यासाठी गृह खरेदीदारांची ठाणे पश्चिम विभागाला सर्वाधिक पसंती असल्याचे हाऊसिंगडॉटकॉमवरील प्रॉपर्टी शोधातून निदर्शनास आले आहे. हाऊसिंग डॉटकॉमवरील २०२२ मध्ये निवासी मालमत्तांसाठी शोधाच्या संदर्भात ठाणे पश्चिम नंतर बेंगळुरूमधील व्हाइटफिल्ड आणि दिल्ली-एनसीआरमधील नोएडा एक्स्टेन्शन यांचा क्रमांक लागतो. तर कोलकातामधील न्यू टाऊन आणि मुंबईमधील मीरा रोड पूर्व अनुक्रमे ४थ्या व ५व्या स्थानावर होते. अहमदाबादमधील चांदखेडा ६व्या स्थानावर होते आणि त्यानंतर पुण्यातील वाकड, नवी मुंबईतील खारघर, अहमदाबादमधील गोटा आणि अहमदाबादमधील वस्त्राल यांचा क्रमांक होता.
हाऊसिंगडॉटकॉम संशोधनाने निदर्शनास आणले की २०२२ मध्ये १ ते २ कोटीदरम्यानच्या निवासी मालमत्तांसाठी शोधांमध्ये वार्षिक २४ टक्क्यांची वाढ झाली. तसेच गृहखरेदीदारांनी नवीन सदनिकांसाठी शोध घेण्यासोबत मागील वर्षाच्या तुलनेत २०२२ मध्ये चौकशी ५२ टक्क्यांनी वाढली. २०२२ मध्ये रिसेल मालमत्तांसाठी चौकशीमध्ये वार्षिक २ टक्क्यांची घट झाली. २०२२ मध्ये ३ बीएचके व त्यावरील कन्फिग्युरेशन असलेल्या मालमत्तांसाठी ऑनलाइन शोध १.४ पट वाढले.
हाऊसिंगडॉटकॉम, प्रॉपटायगरडॉटकॉम व मकानडॉटकॉमचे ग्रुप सीईओ ध्रुव अगरवाल म्हणाले, ‘‘आमच्या नवीन अहवालामध्ये निदर्शनास आलेले ट्रेण्ड्स पाहता मला भारतीय निवासी रिअल इस्टेट बाजारपेठेच्या भविष्याबाबत आशा आहे. आम्ही अव्वल मायक्रो-बाजारपेठांमध्ये घरांसाठी मागणी प्रबळ राहण्याची अपेक्षा करतो आणि आम्हाला १ कोटी ते २ कोटी रूपयांदरम्यानचे नवीन सदनिका व मालमत्तांप्रती वाढती रूची दिसून येत आहे. तसेच आम्हाला द्वितीय श्रेणीच्या शहरांमध्ये देखील व्यापक क्षमता दिसून येत आहे, जेथे स्वतंत्र घरांच्या तुलनेत सदनिकांसाठी ऑनलाइन प्रॉपर्टी शोधांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे विकासक व रिअल इस्टेट एजंट्सकरिता या शहरांमधील गृहखरेदीदारांच्या गरजांची पूर्तता करण्याची लक्षणीय संधी आहे.’’
श्री. अगरवाल पुढे म्हणाले, ‘‘गेल्या वर्षभरात व्याजदरांमध्ये वाढ झाली असताना देखील या तिमाहीदरम्यान निवासी मालमत्तांची विक्री प्रबळ आहे. एकूण, मला भारतीय निवासी रिअल इस्टेट बाजारपेठेच्या भविष्याबाबत आशा आहे आणि माझा विश्वास आहे की आगामी वर्षांमध्ये शहरीकरण, वाढते डिस्पोजेबल उत्पन्न व अनुकूल सरकारी धोरणे अशा घटकांमुळे उद्योगात वाढ सुरूच राहील.’’
हाऊसिंगडॉटकॉम व्यासपीठावरील (वेबसाइट व मोबाइल अॅप) एकूण शोधांपैकी ६० टक्के ग्राहक निवासी मालमत्ता खरेदी करू पाहत होते, तर उर्वरित ४० टक्के ग्राहकांची भाड्याने घर घेण्याची इच्छा होती. गृहखरेदीसंदर्भात ५० लाख रूपयांखालील सदनिकांना अधिक प्राधान्य देण्यात आले, जेथे या किंमतीच्या श्रेणीमध्ये अधिकाधिक शोध दिसण्यात आले.
तसेच डेटामधून निदर्शनास आले की, २०२२ मध्ये भाड्याच्या घरांसाठी ऑनलाइन मालमत्ता शोधांमध्ये १.५ पट वाढ झाली. २०२२ मध्ये बेंगळुरू, मुंबई व हैदराबादचा भाड्याच्या घरांसाठी शोध व चौकशीमध्ये मोलाचा वाटा होता.
द्वितीय श्रेणीच्या शहरांमध्ये लखनौ गृहखरेदीसाठी अव्वल शहर म्हणून उदयास आले, त्यानंतर जयपूर व इंदौर या शहरांचा क्रमांक होता. २०२२ मध्ये सदनिकांसाठी ऑनलाइन मालमत्ता शोधांमध्ये स्वतंत्र घरांकरिता वार्षिक ८ टक्क्यांच्या तुलनेत वार्षिक २३ टक्क्यांची वाढ झाली. एकूण, अहवालामधून निदर्शनास येते की या सूक्ष्म बाजारपेठांमधील घरांसाठी मागणी २०२३ मध्ये देखील प्रबळ राहील.
Mumbai Real Estate Property Survey Report