कल्याण (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सोशल मीडियाचा वापर जितका चांगला तितकाच वाईट देखील असतो, कारण एकमेकाला मेसेज पाठवताना त्यातून मैत्री होते, परंतु कधीकधी ब्लॉक करण्याचे घटना होतात. त्यातून समज गैरसमज निर्माण होत राहतात. मुंबई ठाणे परिसरात देखील अशीच एक घटना घडली. विशेष म्हणजे रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी असताना यातून दोघांमध्ये चक्क हाणामारी झाली, याचे कारण म्हणजे एका तरुणांनी एका महिलेला मॅसेज संदर्भात विचारणा केल्यास तेव्हा तिचा पती तेथे आला आणि त्याने त्या तरुणाला मारहाण सुरू केली मग दोघांमध्ये चांगलेच तुंबळ युद्ध रंगले आणि ते बघण्यासाठी चांगलीच गर्दी अधिकच जमली होती. मात्र काहींनी मध्ये पडत हे भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात ही तुफान हाणामारीची घटना घडली आहे.
पाण्याची बाटली घ्यायला गेला अन्
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाच्या फलाटावर उभी असताना महिलेला तरुणाने येऊन काहीतरी बोलला. त्यातून पती आणि तरुणामध्ये जोरदार राडा झाला. त्याचे असे झाले उल्हासनगरमध्ये राहणारी एक महिला तिच्या पतीसोबत डोंबिवलीला जाण्यासाठी विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात पाोहचली. काल संध्याकाळी साडे चार वाजता पती पत्नी गाडीच्या प्रतिक्षेत होते. यावेळी पती पाण्याची बाटली घेण्याकरीता कॅन्टीनकडे गेला. त्याचवेळी एक तरुण महिलेच्या जवळ आला. त्याने तू मला ब्लॉक का केले अशी महिलेला विचारणा केली. याचदरम्यान तिचा पती आला. पतीने त्याला जाब विचारला. यातून दोघांमध्ये वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. नागरीकांनी त्यांची हाणामारी सोडविली.
तरुणाला अटक
हाणामारीचा हा प्रकार सुरू असताना चांगलीच गर्दी जमली, परंतु नेमकी त्या तरुणाची त्या महिलेची ओळख होती की नाही हे समजू शकले नाही मात्र कल्याण रेल्वे पोलिसांनी महिलेची छेड आणि तिच्या पतीसोबत हाणामारी करणाऱ्या तरुणाला अटक केली आहे. रेल्वे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणी विठ्ठलवाडी स्टेशनवर असलेल्या पोलिसांच्या मदतीने या तरुणाला ताब्यात घेतले. कल्याण जीआरपी पोलिसांनी या तरुणावर याच्या गुन्हा दाखल करुन अटक केली. बूुधवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यां यांनी दिली आहे. मात्र बराच काळ या घटनेची रेल्वे स्टेशनवर चर्चा सुरू होती.