मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एकेकाळी मुंबई शहर हे सुरक्षित समजले जात असे, परंतु गेल्या चार-पाच वर्षात मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये प्रचंड प्रमाणात गुन्हेगारी वाढली असून महिलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. विशेषतः अल्पवयीन मुली तरुणी इतकेच नव्हे तर कोणत्याही वयोगटातील महिलांवर लैंगिक अत्याचार, विनयभंग, बलात्कार यासारखे प्रकरणी मुंबई महानगरामध्ये तसेच आजूबाजूच्या उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहेत. इतकेच नव्हे तर रेल्वे आणि लोकलमध्ये देखील महिलांवर अत्याचार होत आहेत. मुंबईत एका महिलेला चालत्या रेल्वे गाडीतून एका गुंडांने चक्क डब्याबाहेर फेकून दिले. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे रेल्वेतील महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे.
म्हणून केले हे कृत्य
दादर रेल्वे स्थानकातून उद्यान एक्सप्रेस ही गाडी पुण्याकडे निघाली आणि त्याचवेळी मनोज चौधरी (वय २४) नावाच्या एका इसमाने महिलेशी किरकोळ वाद झाला या कारणावरून तिला चक्क बाहेर फेकून दिले. या घटनेने सुदैवाने महिला प्रवासी बचावली आहे. पोलिसांनी आरोपीला सिएसटी रेल्वे स्थानकावर अटक केली. याबाबत एका रेल्वे अधिकाऱ्यांने सांगितले की, रात्रीच्या सुमारास पुण्याकडे जाण्यासाठी एक महिला उद्यान एक्सप्रेस या रेल्वे गाडीच्या जनरल डब्यामध्ये बसली. तिथे मनोज चौधरी नावाचा इसम आला आणि त्याने २९ वर्षीय महिलेशी वाद घालण्यास सुरुवात केली. तसेच त्याने तिच्यावर हल्ला केला, मात्र हल्लेखोराचा प्रतिकार करत असताना आरोपीने धावत्या ट्रेनमधून तिला धक्का मारून बाहेर फेकले.
महिला डब्यात चढून
ही रेल्वे गाडी दादर स्थानकात प्लॅटफॉर्मवर आली तेव्हा सर्वसाधारण महिला डब्यातील सर्व महिला प्रवासी खाली उतरल्या. त्यावेळी पीडित महिला त्या डब्यात एकटीच राहिली होती. ही संधी पाहून आरोपीने डब्यात प्रवेश केला. हा आरोपी दारूच्या नशेत होता. जेव्हा महिलेने त्याला महिलांच्या डब्यात चढण्यास आक्षेप घेतला तेव्हा आरोपीने महिलेला ट्रेनमधून ढकलले. या प्रकरणी दादर रेल्वे पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Mumbai Railway Express Crime Women Thrown coach