मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई-पुणे जुना हायवेवर अंडा पॉईंट येथे अपघात झाला आहे. ट्रक आणि दोन पिकअप यांच्यातील अपघातात तीन जण ठार झाले असून एक जखमी झाला आहे. आज सकाळच्या सुमारास हा अपघात झाला आहे.
ट्रक (क्र HR 47 C 6541) हा पुणे ते मुंबई या जुन्या हायवेवर अंडा पॉईंट येथे आला. त्याचवेळी चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे हा ट्रक त्याच्यापुढे जात असणारे पिकअप (क्रमांक MH 14 HG 7790) हीस पाठीमागून धडकला. त्यामुळे सदरची पिकअप ही विरुद्ध दिशेला तोंड करून रस्त्यावर डाव्या कुशीवर पलटी झाली. तसेच सदरचा ट्रक पुढे असलेल्या मातीच्या ढिगार्यावर चढून समोरून येणारी नवीन पिकअप (रजिस्ट्रेशन नंबर नाही) हिच्यावर पलटी झाला. या अपघातात नवीन पिकअप मधील चालक (नाव माहित नाही) जागीच ठार झाला. सोबतचे दोन सहप्रवासी गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी आयआरबी कडील ॲम्बुलन्सच्या मदतीने खाजगी रुग्णालय येथे पाठवण्यात आले. मृतदेह पुढील कार्यवाही करीत खोपोली नगरपालिका हॉस्पिटल रुग्णालय येथे नेण्यात आला. सदर अपघातातील वाहने आय आर बी कडील हायड्राच्या मदतीने बाजूला काढून घेण्यात आली. त्यामुळे वाहतूक सुरळीत करण्यात आली.
या अपघातात ट्रक चालक गुरुदीप सिंग तेससिंग सरोवा (वय ४७,वर्षे रा. अंबड, नाशिकः आणि सतीश रामचंद्र पवार (वय ५४ वर्ष, रा. खोपोली) यांचा मृत्यू झाला आहे. तर तिसऱ्या मृताचे नाव कळू शकलेले नाही. या अपघातात
सोफियान शेख हुसेन मुल्ला (वय १९ वर्ष, रा खालापूर) हा जखमी झाला आहे.