सोमवार, सप्टेंबर 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

मुंबई आणि पुण्यातील घरांच्या किंमतीत इतक्या टक्क्यांची वाढ

by Gautam Sancheti
जुलै 14, 2023 | 5:06 am
in राष्ट्रीय
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – या वर्षातील एप्रिल ते जून कालावधीदरम्यान भारतातील निवासी मालमत्ता बाजारपेठेत घरांच्या किमतीमध्ये सरासरी वार्षिक ६ टक्क्यांची वाढ झाली आहे. महाराष्‍ट्रातील दोन प्रमुख मालमत्ता बाजारपेठा मुंबई व पुणे येथील घरांच्या किंमतीत प्रत्येकी ३ टक्क्यांनी वाढ झाली, जेथे मुंबईमध्ये सरासरी किंमत प्रतिचौरस फूट १०,१०० ते १०,३०० रूपये राहिली, तर पुण्यामध्ये किमती प्रतिचौरस फूट ५,६०० ते ५,८०० रूपये होत्या. देशातील आघाडीची ऑनलाइन रिअल इस्टेट ब्रोकरेज कंपनी प्रॉपटायगरने जारी केलेल्या डेटामधून ही माहिती मिळाली आहे. अहवालात समाविष्ट बाजारपेठांमध्ये मुंबई, पुण्यासहित अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, आणि दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्राचा समावेश आहे.

आघाडीची डिजिटल रिअल इस्टेट ब्रोकरेज कंपनी आणि हाऊसिंगडॉटकॉम व मकानडॉटकॉमचे मालकीहक्क असलेल्या आरईए इंडियाचा भाग असलेली कंपनी प्रॉपटायगरने नुकतेच जारी केलेला अहवाल ‘रिअल इनसाइट रेसिडेन्शियल – एप्रिल-जून २०२३’ मधून निदर्शनास आले की, भारतातील आठ प्रमुख शहरांमधील निवासी मालमत्तांची भारित सरासरी किंमत एप्रिल ते जून कालावधीदरम्यान प्रतिचौरस फूट ७,००० ते ७,२०० रूपयांपर्यंत पोहोचली. गेल्या वर्षाच्या संबंधित कालावधीच्या तुलनेत किमतीत ६ टक्क्यांची वाढ झाली आहे. हा अहवाल भारतातील प्रमुख शहरांमधील रिअल इस्टेट बाजारपेठेच्या विद्यमान स्थितीबाबत बहुमूल्य माहिती देतो.

आरईए इंडियाचे ग्रुप सीएफओ आणि प्रॉपटायगरडॉटकॉम येथील व्यवसाय प्रमुख श्री. विकास वाधवान म्हणाले, “कोविडनंतरच्या काळात भारतातील प्रमुख शहरांमध्ये घरांच्या किमतीत वाढ होत आहे. भांडवल मूल्यांमधील ही वाढ गुंतवणूकदारांचे भारतातील प्रमुख रिअल इस्टेट बाजारपेठांकडे लक्ष वेधून घेत असताना नवीन पुरवठ्यामधील वाढीमुळे किमतीत काहीशी वाढ होत आहे.”

आरईए इंडियाच्या संशोधन प्रमुख श्रीमती अंकिता सूद म्हणाल्या, “गुरूग्राममध्ये व्यवसाय व मोठ्या कंपन्यांकडून मागणीमध्ये वाढ होताना दिसण्यात येत आहे. शहर ग्रेड ए व्यावसायिक विकासासंदर्भात प्रभुत्व राखत आहे, तसेच व्यवसायासाठी अव्वल निवड म्हणून आपले स्थान प्रबळ करत आहे. ही गती कायम राखत गुरूग्राम मालमत्ता बाजारपेठेत लक्झरी व मध्यम विभागाच्या गृहनिर्माणासाठी उत्तम मागणी दिसण्यात आली आहे. २०२३ च्या दुसऱ्या तिमाहीत गुरूग्रामच्या वार्षिक भारित सरासरी मालमत्ता किमतीत १२ टक्क्यांची वाढ दिसण्यात आली, जेथे शहराने बेंगळुरू (९ टक्के) व नोएडा (८ टक्के) या शहरांना मागे टाकले.”

श्रीमती सूद पुढे म्हणाल्या, “दिल्ली व आसपासच्या क्षेत्रांमधील ग्राहक सुधारित सुविधा व सुधारित जीवनशैलीचा शोध घेण्यासोबत पारंपारिक मालमत्ता स्वरूपांमधून स्थलांतरित होत असल्यामुळे मागणीमध्ये वाढ झाली आहे. तसेच मर्यादित पुरवठ्याने देखील किमतीत वाढ होण्याप्रती योगदान दिले आहे.”

उपलब्ध माहितीनुसार अहमदाबादमध्ये २०२३ च्या दुसऱ्या तिमाहीदरम्यान घरांच्या किमतीत वार्षिक ७ टक्क्यांची वाढ झाली, जेथे घरांच्या किमती प्रतिचौरस फूट ३,७०० ते ३,९०० रूपयांपर्यंत पोहोचल्या. बेंगळुरूमध्ये घरांच्या किमतीत ९ टक्क्यांची वाढ झाली, जेथे घरांच्या सरासरी किमती प्रतिचौरस फूट ६,३०० ते ६,५०० रूपयांपर्यंत पोहोचल्या.

चेन्नईमध्ये घरांच्या किमती ३ टक्क्यांनी वाढून प्रतिचौरस फूट ५,८०० ते ६,००० रूपयांपर्यंत पोहोचल्या. दिल्ली-एनसीआरमध्ये घरांच्या किमती ६ टक्क्यांनी वाढून प्रतिचौरस फूट ४,८०० ते ५,००० रूपयांपर्यंत पोहोचल्या. दरम्यान, राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील गुरूग्राममधील घरांच्या किमती १२ टक्क्यांनी वाढून प्रतिचौरस फूट ७,००० ते ७,२०० रूपयांपर्यंत पोहोचल्या आणि नोएडामध्ये घरांच्या किमती ८ टक्क्यांनी वाढून प्रतिचौरस फूट ५,६०० ते ५,८०० रूपयांपर्यंत पोहोचल्या.

हैदराबादमध्ये सरासरी घरांच्या किमती ५ टक्क्यांनी वाढून प्रतिचौरस फूट ६,४०० ते ६,६०० रूपयांपर्यंत पोहोचल्या. कोलकातामध्ये घरांच्या किमती ६ टक्क्यांनी वाढून प्रतिचौरस फूट ४,६०० ते ४,८०० रूपयांपर्यंत पोहोचल्या.

श्री. वाधवान पुढे म्हणाले, “किमतीत वाढ होण्यासोबत तारण दरांमध्ये वाढ झाली असताना देखील घरांसाठी मागणी मोठी राहिली आहे. अधिक पुढे जात, आगामी महिन्यांमध्ये गृहकर्जांवरील व्याजदर स्थिर राहण्याची किंवा कमी होण्याची शक्यता असताना आम्हाला घरांच्या मागणीमध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे. आमचा ठाम विश्वास आहे की, गृहनिर्माण बाजारपेठ चक्रीय वाढीच्या काळात आहे.”

एप्रिल ते जून कालावधीदरम्यान आठ प्रमुख शहरांमधील घरांच्या विक्रीत वार्षिक ८ टक्क्यांची वाढ झाली, जेथे ८०,२५० सदनिकांची विक्री झाली. विक्रीमधील वाढीचे श्रेय विशेषत: मुंबई व पुण्यामध्ये मागणीत झालेल्या वाढीला जाऊ शकते. गेल्या वर्षाच्या याच कालावधीमध्ये (एप्रिल ते जून २०२२) आठ अव्वल शहरांमधील प्रमुख निवासी बाजारपेठांमध्ये ७४,३२० सदनिकांची विक्री झाली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सौर कृषी वाहिनी योजनेसाठी या जिल्ह्यांची निवड… ३५ हजार एकर जमीन निश्चित

Next Post

अपार्टमेंटच्या पदाधिकाऱ्यांनो सावधान! लिफ्टमुळे तुमच्यावरही दाखल होईल गुन्हा… बघा, मुंबईत नेमकं काय घडलं?

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी खर्चाची तयारी ठेवावी, जाणून घ्या, मंगळवार, ९ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 8, 2025
INDIA GOVERMENT
संमिश्र वार्ता

भारत सरकारमधील विविध पदांवर थेट नेमणूक…येथे करा ऑनलाईन अर्ज

सप्टेंबर 8, 2025
andolan 1
राज्य

संयुक्त किसान मोर्चाचे राष्ट्रीय नेते करणार विदर्भ दौरा…आत्महत्याग्रस्त शेतकरी परिवाराशी साधणार संवाद

सप्टेंबर 8, 2025
Untitled 4
महत्त्वाच्या बातम्या

नेपाळमध्ये निषेध मोर्चात १८ जणांचा मृत्यू, २५० हून अधिक लोक जखमी

सप्टेंबर 8, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
राज्य

आता राज्यातील एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम…

सप्टेंबर 8, 2025
reliance retail
संमिश्र वार्ता

रिलायन्स रिटेल पहिल्याच दिवशी कमी जीएसटी दरांचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवणार….

सप्टेंबर 8, 2025
NMC Nashik 1
संमिश्र वार्ता

नाशिक महानगरपालिकेत प्रारुप प्रभाग रचनेवरील हरकती, सुचना अर्जावर या तारखेला होणार सुनावणी

सप्टेंबर 8, 2025
Untitled 3
मुख्य बातमी

मुंबईत उध्दव ठाकरे यांच्यासोबत काँग्रेस नेत्यांची बैठक…विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाबरोबरच या विषयांवर चर्चा

सप्टेंबर 8, 2025
Next Post
Building Lift

अपार्टमेंटच्या पदाधिकाऱ्यांनो सावधान! लिफ्टमुळे तुमच्यावरही दाखल होईल गुन्हा... बघा, मुंबईत नेमकं काय घडलं?

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011