मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर लोणावळ्याजवळील खंडाळा घाटात ओव्हर ब्रीजवर ऑइल टँकरचा अपघात झाला आहे. त्यामुळे टँकरला भीषण आग लागली आहे. यामुळे ब्रीज खाली देखील अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात दोघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तसेच, या अपघातामुळे तासाभरापासून वाहतूक ठप्प आहे.
टँकरची आग आणि आपत्तीजनक परिस्थिती लक्षात घेऊन बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. सध्या वाहतूक लोणावळा शहरातून वळविण्यात आली आहे. तासाभरापासून वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे एक्स्प्रेस वेवर वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या आहेत. त्यामुळे बचावकार्य वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
एक्सप्रेस वेवर मोठ्या प्रमाणात ऑईल पसरले आहे. या अपघातातील जखमी आणि मृतांचा नक्की आकडा अद्याप समजू शकलेला नाही. मात्र, या आकड्यात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पोलिस, अग्नीशमनसह विविध विभागांचे पथक घटनास्थळी दाखल आहे. सर्वप्रथम आगीवर नियंत्रण मिळविण्याला प्राधान्य दिले जात आहे. जखमींना जवळच्या हॉस्पिलमध्ये दाखल करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
Mumbai Pune Express Way Oil Tanker Fire Khandala Ghat