मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काही महिला देखील पुरुषांना ब्लॅकमेल करतात. अशीच एक घटना दीड वर्षांपूर्वी मुंबई घडली होती. परंतु त्याचा तपास आता लागला असून या प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांनी दीड वर्ष जुन्या हनी ट्रॅप केसचा तपास लावला आहे. भयानक गोष्ट म्हणजे एका महिलेने ६४ वर्षीय व्यावसायिकावर मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बलात्काराच्या प्रयत्नाचा आरोप लावला होता आणि दावा केला होता की बलात्काराच्या प्रयत्नात ती जखमी देखील झाली होती. पण त्या महिलेने बलात्काराच्या प्रयत्नात विरोध करताना जखमी झाल्याचे नाटक केले होते आणि हाताला लागलेले रक्त तिचे नव्हे तर मुळात कोंबडीच रक्त होते.
कोंबडीच्या रक्ताचा वापर
हनीट्रॅप मध्ये परस्पर ब्लॅकमेल किंवा आर्थिक हेतूसाठी रोमँटिक किंवा लैंगिक संबंधांचा वापर केला जातो. काही महिला एखाद्या व्यक्तीशी संपर्क साधून खोट्या नातेसंबंधात अडकवण्याचा प्रयत्न करू शकतात किंवा प्रभाव टाकू शकतात. मुंबईत हनीट्रॅपची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने ६४ वर्षीय व्यावसायिकावर लैंगिक छळाचा आरोप करत, पुरावा म्हणून कोंबडीच्या रक्ताचा वापर केला आहे. मात्र तेव्हा महिलेचा आरोप केला होता की, व्यावसायिकाने तिला एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बोलावून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला, यावेळी ती स्वतःचा बचाव करताना गंभीर जखमी झाली. दुसरीकडे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता महिलेच्या हातावरील रक्त तिचे नसून कोंबडीचे असल्याचे आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी महिला आणि तिच्या साथीदारांना अटक केली आहे
२ कोटींची मागणी
पोलिसांनी सांगितले की, मोनिका भगवान चौधरी नावाच्या महिलेने आपल्या तीन सहकाऱ्यांसोबत हनी ट्रॅपचा कट रचला आणि त्या व्यावसायिकाकडून ३ कोटी रुपये उकळले होते. मात्र गुन्हे शाखेच्या युनिटने मागच्या आठवड्यात मोनिका चौधरी आणि तिचे तीन सहकारी अनिल उर्फ आकाश चौधरी, लुबना वजीर उर्फ सपना आणि ज्वेलर मनिष सोदी यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. या चार जणांच्या टोळीने हनी ट्रॅपचा सापळा रचून हॉटेलमधून ३ कोटी २५ लाख रुपये उकळल्याची तक्रार या व्यावसायिकाने नोव्हेंबर २०२१ मध्ये पोलिसांकडे केली होती. तसेच आरोपीने व्हिडीओद्वारे धमकी देत २ कोटींची मागणी केली.
अडकवण्याची योजना
पोलिसांनी याप्रकरणी महिलेला जून २०२२ मध्ये अटक केली होती. यापुर्वी त्यांनी हॉटेलमध्येच व्यावसायिकाला अडकवण्याची योजना आखली. काही वेळानंतर मोनिकाने गोंधळ घालायला सुरुवात केली की व्यावसायिकाने तिच्यासोबत बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आणि त्याने तिला मारहाणही केली.यावेळी मोनिकाने गोंधळ करत व्हिडीओही शूट केला. या व्हिडीओच्या आधारे ही गॅंग या व्यावसायिकाला ब्लॅकमेल करत होती. या प्रकरणामुळे आता सर्वत्र खळबळ उडाली आहे.