मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पोलिसांच्या बॉम्बशोधक आणि नाशक पथकामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणारे श्वानपथक तसेच गुन्हा तपासणीत गुन्हेगाराचा माग काढणारे श्वानांचे कौशल्य अत्यंत महत्त्वाचे ठरते. श्वानांच्या वेगवेगळ्या जातींमध्ये बिगल, शीत्सझू, रॉटविलर, जर्मन शेफर्ड, लॅब्रॉडॉर, पिटबूल, बॉक्सर, हाउंडस, टेरिअर, डॉबरमॅन आदींचा समावेश असतो त्यापैकीच लॅब्रॉडॉर जातीचे श्वान पोलीस खात्याच्या तपास विभागात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात, असे दिसून येते. मुंबई पोलिसांच्या तपास विभागात महत्त्वाची कामगिरी बजावणारा लाभदाय लॅब्रॉडॉर जातीचा मॅक्स नामक श्वान मरण पावला. याबद्दल सर्वांनी हळहळ व्यक्त केली आहे. कारण त्याची कामगिरी ही पोलीस विभाग विभागासाठी अत्यंत मोलाची ठरली होती. सन १९९३ पासून ते आतापर्यंत मुंबई पोलीस दलातला एकमेव गोल्ड मेडलिस्ट सुपरडॉग ठरला आहे. मुंबई पोलिसांसाठी मॅक्स हा हिरोपेक्षा कमी नव्हता. रविवार २३ जुलै रोजी विरारमध्ये निधन झाले.
पुण्यात प्रशिक्षण
लॅब्रोडॉर जातीचा हा मॅक्स श्वान अवघ्या काही महिन्यांचाच होता मुंबईत पोलीस दलात तो सन २०१२ मध्ये दाखल झाला. सुमारे दीड वर्ष त्याचे पुण्यातील डॉग ट्रेनिंग सेंटरमध्ये रितसर प्रशिक्षण झाले. त्यानंतर सन २०१३ पासून तो मुंबई पोलिसांसोबत काम करु लागला. खरे म्हणजे स्फोटकांसारख्या वस्तूंना शोधून काढण्याचे कार्य संबंधित श्वान हा केवळ त्याच्या हॅण्डलरच्या आदेशानुसार करीत असतो. या हॅण्डलरचे तब्बल २४ आठवड्यांचे विशेष प्रशिक्षण संबंधित श्वानासोबत अकादमीत होत असते. याचाच अर्थ, श्वान आणि तो हॅण्डलर हे एकाचवेळी प्रशिक्षित होत असतात. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात मॅक्स आजारपणामुळे रिटायर झाला होता. त्यानंतर त्याला विरारमधल्या एका कुटुंबानं दत्तक घेतले होते. त्याचा सांभाळ तेच करत होते.
मनाला चटका लावून गेले…
मुंबई पोलीस दलात त्याचा प्रमुख्याने सांभाळ हा पीएसआय सचिन जाधव आणि कॉन्स्टेबल संदीप पाटील यांनी केला होता. सचिन जाधव यांच्या हाताखाली मॅक्सने चांगली कामगिरी करुन दाखवली. प्रचंड एक्टीव्ह, रात्रीच्या अंधारातही गोष्टी शोधण्यास पोलिसांना मदत करणे, व्हीआयपी सुरक्षा व्यवस्थेत चोख कामगिरी बजावणे यासाठी त्याचे प्रचंड कौतुकही झाले होते. म्हैसूरमधल्या एका स्पर्धेत मॅक्सने अवघ्या १० मिनिटात एक्स्प्लोझिव्ह शोधून दाखवण्याची किमया करुन दाखवली होती. मॅक्स एक्स्प्लोझिव्ह शोधण्यात माहीर होता. बॅग असो, जमिनीखाली असो किंवा मग माणसाच्या शरीरात कुठूही लपवण्यात आलेले एक्स्प्लोझिव्ह शोधण्यात मॅक्स तरबेज होता.
डॉग हॅण्डलर’ हे एका श्वान एकावेळी जास्तीत जास्त २० मिनिटे गंध घेऊन कार्य करू शकतात, यामुळे त्यांची विशेष ‘बडदास्त’ या हॅण्डलरला ठेवावी लागते. बॉम्ब डिटेक्शन एन्ड डिसपोजल स्क्वॉडमध्ये मॅक्सने मुंबई पोलिसांत कामगिरी केली. सन २०१६ साली त्याने सुवर्ण पदक जिंकले होते, तो चपळ आणि शोधकार्यात माहीर असल्याने मुंबई पोलिस दलात अल्पावधितच सगळ्यांचा लाडका झाला होता. सन २०१३ ते २०२३ असा दहा वर्षांचा काळ मॅक्सने मुंबई पोलिस दलात घालवला. त्याच्या जाण्याने संपूर्ण मुंबई दलाकडून हळहळ व्यक्त करण्यात आली आहे.