मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दोन मुलींसोबत मोटरसायकलवर धोकादायक स्टंट करणे तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. त्याच्या या स्टंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्याची गंभीर दखल मुंबई पोलिसांनी घेतली. त्यामुळेच २४ वर्षीय तरुणाला पोलिसांनी तातडीने अटक केली. पोलिस म्हणाले की, आरोपी हा हिस्ट्री शीटर असून त्याच्यावर अँटॉप हिल आणि वडाळा टीटी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
या प्रकरणाची माहिती देताना एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, अलीकडेच आरोपीने दोन मुलींसह त्याच्या दुचाकीवर धोकादायक स्टंट केले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. शहरातील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) परिसरात ही घटना घडली. व्हिडिओ समोर आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच, या प्रकरणाची चौकशी करून त्याला पकडण्यासाठी एक पथक तयार करण्यात आले.
पोलिसांनी सांगितले की, गुप्त माहितीच्या आधारे आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीला भारतीय दंड संहिता (IPC) च्या संबंधित कलम 308 (दोषी हत्येचा प्रयत्न) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलमांखाली अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
https://twitter.com/ANI/status/1642621271790977025?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1640953932187942915?s=20
Mumbai Police Arrest Youth Horror Stunt on Bike Video