मुंबई – मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने जुहू येथील एका पंचतारांकित हॉटेलवर छापा टाकून एका ३२ वर्षीय मॉडेलला अटक केली आहे. या मॉडेलविरुद्ध सेक्स रॅकेट चालवण्याचा आरोप आहे. गुन्हे शाखेच्या अधिका-याच्या माहितीनुसार, संबंधित मॉडेलने आपल्या रॅकेटमध्ये टीव्ही अभिनेते आणि मॉडल्सना सहभागी करून घेतले होते. यादरम्यान इतर दोन अभिनेत्रींची सुटका करण्यात आली आहे.
अभिनेत्रीला दिले चार लाख रुपये
या छाप्यात सुटका करण्यात आलेल्या मॉडेल्स आणि अभिनेत्रींनी प्रसिद्ध मनोरंजन वाहिन्यांसोबतही काम केलेले आहे. त्याशिवाय एका अभिनेत्रीने साबणाची जाहिरातही केली आहे. या अभिनेत्रीला चार लाख रुपये देण्यात आले होते. गुन्हे शाखेला याबाबत माहिती मिळाल्यानंतर छापा मारून संशयितांना अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध भादंविअंतर्गत विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.
लॉकडाउनमुळे कु-हाड
कोरोना लॉकडाउनमुळे अनेक क्षेत्रांमधील लोकांचे रोजगार गेले आहेत. मनोरंजन क्षेत्रेही त्याला अपवाद नाही. अनेक कलाकार उपजीविका भागविण्यासाठी वेगवेगळी कामे करत आहेत. काही चांगल्या मार्गाने तर, काही गैरमार्गाने पैसे कमविण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु गैरमार्गाने पैसे कमविणार्या अनेक कलाकारांचे नुकसान झाले आहे.