बुधवार, ऑगस्ट 6, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मुंबईत आयोजित वेव्हज कॉस्प्ले चॅम्पियनशिप वाइल्डकार्ड शोडाउनला भरघोस प्रतिसाद…

by Gautam Sancheti
एप्रिल 20, 2025 | 7:17 am
in संमिश्र वार्ता
0
Waves193YV5I

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदे (वेव्हज) अंतर्गत शनिवारी मुंबईत ठाकूर विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इथे वेव्हज कॉस्प्ले चॅम्पियनशिप वाइल्डकार्ड शोडाउन या धमाकेदार उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातील सादरीकरणांतून स्वप्ननगरी मुंबईला रुपेरी तारकांच्या मांदियाळीचे स्वरूप आले होते. क्रिएटर्स स्ट्रीट, भारतीय कॉमिक्स संघटना (आयसीए) तसेचभारतीय माध्यम आणि मनोरंजन संघटनेने (एमइएआय) संयुक्तपणे हा उपक्रम आयोजित केला होता. या उपक्रमाला भारतातील आगामी पॉप-संस्कृती महोत्सव एपीको कॉन (Epiko Con) यांचे सहयोग लाभला होता.

वेव्हज कॉस्प्ले अजिंक्यपदाच्या महाअंतिम सोहळ्याची पूर्वतयारी म्हणून या धमाकेदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात 50 पेक्षा जास्त नामवंत कॉस्प्लेयर्सनी सहभाग नोंदवला. त्यांची जबरदस्त सादरीकरणे, रुपेरी पडद्याला साजेशी वेशभूषा आणि सळसळत्या उर्जेने संपूर्ण रंगमंचही उर्जेने भारून गेला होता.

व्हार्फ स्ट्रीट स्टुडिओजचे (Wharf Street Studios) संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वेंकटेश, फॉर्बिडन व्हर्सचे (Forbidden Verse) अजय कृष्णा आणि भारतीय कॉमिक्स संघटनेचे सचिव अनादी अभिलाष यांच्या परीक्षक मंडळाने 30 वाइल्डकार्ड स्पर्धकांची निवड केली. आता हे स्पर्धक 1 ते 4 मे 2025 दरम्यान मुंबईत जिओ वर्ल्ड सेंटर इथे होणार असलेल्या वेव्हज शिखर परिषदेतील महाअंतिम सोहळ्यात सहभागी होतील.

भारताच्या सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवणारे भगवान नरसिंहाच्या प्रतिरुपाचे सशक्त आणि प्रभावी सादरीकरण हे या कार्यक्रमाचे एक प्रमुख आकर्षण ठरले. त्याचप्रमाणे, भारतातील विस्तारत्या कॉस्प्ले क्षेत्राशी संबंधित प्रसिद्ध सेलिब्रिटी, आशय सामग्री निर्माते आणि प्रभावशाली व्यक्तिमत्वांचा सहभागही या उपक्रमाचे ठळक आकर्षण ठरले. चाहत्यांच्या उर्जेने भारलेल्या या सोहळ्यात कलाकारांसोबत छायाचित्र घेण्याची संधी, उत्स्फुर्त सादरीकरणे आणि समाज माध्यमांवर व्हायरल होणाऱ्या रंजक घडामोडींच्या क्षणांनीही अनोखे रंग भरले.

उच्च उर्जा आणि उत्साहाने सळसळणारा हा कार्यक्रम केवळ एक पात्रता फेरी नव्हती—तर ती एक सांस्कृतिक घटना ठरली. या ठिकाणी घडलेला प्रत्येक क्षण हा भारतातील झपाट्याने वाढणाऱ्या कॉस्प्ले क्रांतीतील समुदाय, सर्जनशीलता आणि युवकांच्या अभिव्यक्तीची ताकद दर्शवणारा होता. ‘वाइल्डकार्ड शोडाऊन’ हा कार्यक्रम प्रचंड यशस्वी ठरला आणि त्याने आतापर्यंतचा भारतातील सर्वात मोठ्या कॉस्प्ले चळवळीसाठी वातावरण निर्मिती केली. अफलातून कलाकुसर ते प्रभावी सादरीकरणांपर्यंत, मुंबईतील हा शोडाऊन याचे जिवंत उदाहरण होता की भारतात कॉस्प्ले केवळ वाढत नाहीये—तर तो धडाक्यात फोफावत आहे.

“हा कार्यक्रम दाखवतो की भारतात कॉस्प्ले चळवळ किती प्रभावशाली होत चालली आहे,” असं एका परीक्षक सदस्याने सांगितलं. “ती खरीखुरी ऊर्जा, तो प्रयत्न, आणि पात्रांवरील प्रेम—हे सगळं दिसून येत आहे, आणि दरवर्षी ते आणखी मोठं होत आहे,” असं ते म्हणाले.

अंतिम फेरीमध्ये संपूर्ण भारतातील सर्वोत्तम कॉस्प्लेयर्स सहभागी होतील आणि विजेत्यांना रोख बक्षिसे तसेच खास प्रदर्शनाची संधी दिली जाईल. परीक्षक मंडळात अ‍ॅनिमेशन, चित्रपट आणि गेमिंग क्षेत्रातील प्रमुख स्टुडिओंचे प्रतिनिधी असतील. या चॅम्पियनशिपचे विशेष आकर्षण म्हणजे आयसीए, फॉरबिडन वर्स, टीव्हीएजीए, एमइएआय, क्रियेटर स्ट्रीट आणि पॉप संस्कृतीची ताकद एपिको कॉन यांच्याशी झालेली सहयोगी भागीदारी हे होय.

वेव्हज (WAVES) काय आहे…
भारत सरकारद्वारे 1 ते 4 मे 2025 या कालावधीत मुंबईत माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठी मोलाचा टप्पा ठरणारी पहिली वेव्हज (WAVES), वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेन्मेंट समिट (डब्ल्यूएडब्ल्यूएस), अर्थात जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषद आयोजित करण्यात आली आहे.

आपण उद्योग व्यावसायिक, गुंतवणूकदार निर्माते, अथवा इनोव्हेटर (नवोन्मेशी) असाल, ही परिषद एकमेकांशी जोडण्यासाठी, सहकार्य करण्यासाठी, आणि नवोन्मेषासाठी आणि एम अँड ई परिप्रेक्ष्यात योगदान देण्यासाठी आगळे जागतिक व्यासपीठ मिळवून देईल.

वेव्हज, कंटेंट क्रिएशन (आशय निर्मिती), इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी (बौद्धिक संपदा) आणि टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशनचे (तंत्रज्ञान नवोन्मेष) केंद्र म्हणून भारताचे स्थान उंचावून, भारताच्या सृजनशील प्रतिभेला बळ देईल. ब्रॉडकास्टिंग, प्रिंट मीडिया, टेलिव्हिजन, रेडिओ, चित्रपट, अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स, ध्वनी आणि संगीत, जाहिरात, डिजिटल मीडिया, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, जनेरेटिव्ह एआय, ऑगमेंटेड रिअॅलिटी (एआर), व्हर्च्युअल रिअॅलिटी (व्हीआर), आणि एक्सटेंडेड रिअॅलिटी (एक्सआर), हे उद्योग आणि क्षेत्र परिषदेच्या केंद्रस्थानी असतील.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ऊर्जा राज्यमंत्र्यांनी केली या कोळसा खाण प्रकल्पाची पाहणी…

Next Post

भरधाव मालट्रकने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
crime 13

भरधाव मालट्रकने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना धनलाभाचे संकेत मिळतील, जाणून घ्या, बुधवार, ६ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 5, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1

राज्यात या पाच अधिका-यांच्या बदल्या…नाशिक झेडपीच्या सीईओपदी या अधिका-याची नियुक्ती

ऑगस्ट 5, 2025
Screenshot 20250805 190544 WhatsApp 1

नाशिकमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पूर्वतयारीचा राज्य निवडणूक आयुक्तांनी घेतला आढावा

ऑगस्ट 5, 2025
IMG 20250805 WA0276 1

आंदोलनानंतर फुटलेल्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम बुधवारी सुरू होणार

ऑगस्ट 5, 2025
Rorr EZ Sigma Electric Red I 16 9

ओबेन इलेक्ट्रिकने नेक्स्ट-जेन रॉर ईझी सिग्मा लाँच केली…या तारखेपासून डिलिव्हरीला सुरुवात

ऑगस्ट 5, 2025
fir111

गिफ्ट हाऊसमध्ये बालकामगार, व्यावसायीकास पडले चांगलेच महागात…गुन्हा दाखल

ऑगस्ट 5, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011